आज देशव्यापी संपामध्ये सांगली जिल्ह्यात पाच ठिकाणी आशा व गटप्रवर्तक यांनी पंचायत समिती समोर स्थानिक पातळीवर प्रश्नाबाबत जोरदार निदर्शने करण्यात आले
आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानात शहर व ग्रामीण आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक या कोरोना च्या महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत .पण त्यांच्या कामाला तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे .तरी ही केंद्र सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही म्हणून आज देशभर आशा व गटप्रवर्तक या आपल्या मागण्या घेऊन पंचायत समिती समोर निदर्शने करण्यात आले आहेत यावेळी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने प्रत्येक ठिकाणी मा गटविकास अधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली आहे या निदर्शने नेतृत्व युनियन च्या जिल्हा अध्यक्षा कॉ मिना कोळी ,जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी ,कॉ दिगंबर कांबळे ,कॉ सुरेखा जाधव , अंजु नदाफ,शबाना आगा,सुवर्णा सणगर,विना नलवडे ,शांता जाधव, शोभा भोसले ,लता जाधव, राजश्री सुतार, सिमा कुंभार, रागिणी सुर्यवंशी, रुपाली महाडिक, मनिषा पाटोळे, अरुणा कदम,हेमा इमन्नावर,वैशाली पवार, आशा शिंदे,सुनंदा सातपुते, संगिता माळी, गिता बाबर मालन व्हनकंडे,सरिता पवार, इ सर्व जण उपस्थित होते व खालील मागण्याची दखल घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली
मागण्या :
१)आशा व गटप्रवर्तकांचे थकित सर्व मानधन वाढीव रकमेसह त्वरित देण्यात यावे.
२)कोव्हीड च्या कामासाठी असलेला १०००/५०० रु भत्ता बंद करण्यात आला आहे अशा प्रकारचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आशा व गटप्रवर्तकांच्या मध्ये गोंधळाची परिस्थिती आहे कोविड १९संबंधित सर्व कामे चालू आहेत. अजून कोविड संक्रमण रुग्ण संख्या 0 नाही त्यामुळे सदर चा भत्ता पूर्ववत चालू ठेवावा.
३)आशा व गटप्रवर्तकांना कोविड लसीकरणासाठी जाहीर केलेले प्रतिदिन २००रु भत्ता तात्काळ देण्यात यावा.
५)आशा व गटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी.
६)पल्स पोलिव व कुष्ठरोग सर्व्हेक्षणाचे थकित मोबदला त्वरित अदा करण्यात यावे.
७)गटप्रवर्तकांचा सॉफ्टवेअर भत्ता फरका सहित वर्ग करण्यात यावा.
८)आरोग्य वर्धिनी मध्ये गटप्रवर्तकांना ही मोबदला देण्यात यावे.
९)आशा व गटप्रवर्तकांचे ग्रामपंचायत स्तरावरील थकित प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji