दिंनाक २२ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षण संचालक श्री दत्तात्र्य जगताप , यांची शिक्षण संचालनालय पुणे येथे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन खालील मागण्यावर सविस्तर आशि चर्चा झाली .


मागणी _१ ) शालेय पोषण आहार कामगांराना तामिळनाडुच्या धर्तीवर ११ हजार रुपये मानधन द्या .
उत्तर -- या मागणीवर संचालका बरोबर सविस्तर आशि चर्चा झाली व त्यांनी असे सांगितले की , आम्ही जुन मध्येच शासनाला  ३००० हजार रुपये मानधन या कामगारला दिले पाहिजे , कारण ५० रूपये रोजाप्रमाणे हे कामगार काम करू शकत नाहीत , असे शिक्षण संचालक BC च्या मिटींग मध्ये म्हणालो , की त्यांना कमित कमी ३००० हजार रूपये ची तात्काळ वाढ केली पाहिजे , आसे शिक्षण संचालक यांनी सांगितले .
२ ) जुन , जुलै , ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे तांदुळ ,व धान्यादी मालाचे वितरण तात्काळ वाटप करा .
उत्तर > या मध्ये सविस्तर चर्चा झाली व त्यांनी सांगितले की कोरोना मुळे निविदा प्रक्रिया लांबणीवर पडली आहे . ती लवकरच सुरू केली जाईल .
३ ) शैक्षणिक वर्ष २०२१ _२०२२ या वर्षाची मानधनाची रक्कम जिल्हास्तरावर ताबडतोब वर्ग करा .
उत्तर > राज्यातील सर्व जिल्ह्याला या अगोदर ऑगस्ट महिन्या पर्यंत बजेट पाठवले आहे . आणि आत्ता तात्काळ जिल्हास्तरावर वर्षभर पुरेल तेवढी रक्कम आम्ही तात्काळ वाटप करू .
४ ) शालेय पोषण आहार कामगाराना गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत ओळख पत्र देण्यात यावे .
उत्तर > हे ओळख पत्र देता येत नाही , कामगारानी तेथील मु अ कडुन घ्यावे . नाही तर तुमच्या संघटने मार्फत द्यावे .
५ ) सेंट्रल किचन प्रणाली रद्द करा .
उत्तर > शासन स्तरावर प्रत्यन करावे .
        इत्यादी सह अनेक मागण्यावर जवळपास एक तास चर्चा केली , या वेळी शिक्षण संचालक श्री दत्तात्र्य जगताप , शालेय पोषण आहार चे माजी अधिक्षक श्री सुरेश वाघमोडे साहेब , नविन अधिक्षक श्री मुळे साहेब , श्री कुलकर्णी साहेब .
 व शिष्टमंडळा मध्ये राज्य अध्यक्ष  
कॉ प्रभाकर नागरगोजे , कॉ डॉ अशोक थोरात , कॉ मिरा शिंदे , कॉ कुसुम देशमुख , कॉ मन्सुर कोतवाल इत्यादी संघटनेचे पदाधिकारी हजर होते .
  आणि त्यांनी आपल्याला मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी आठ दिवसात तुम्हाला आम्ही लेखी पत्र देतो , असे सांगितले . तुम्ही बेमुद्धत आंदोलनाची कृती करू नका .
    आशि चर्चा शिक्षण संचालका बरोबर झाली आहे . 

       आपला विश्वासु .
   कॉ डॉ अशोक थोरात.