आशा व गट गट प्रवर्तकांचे .
थकीत मानधन दिवाळी पूर्वी खात्यात वर्ग करा नसता तीव्र आरोग्य मंत्री यांच्या कार्यालयासमोर करणार तीव्र आंदोलन.
आशा गट प्रवर्तक भगिनींना आरोग्य मंत्री महोदयांनी अनेक दिवसांच्या संघर्षानतर वाढीव मानधन 2019 मध्ये व 2020 मध्ये अनुक्रमे आशा सेविका 3000 आणि गट प्रा वर्तक 4200 रु जाहीर केले आहेत पण त्याची आमल बजावणी फारच संथ गतीने होतेय अजूनही एप्रिल 2021 पासून त्यांचे वाढीव मानधन मिळाले नाही.आठ महिन्यापासून फक्त वेठबिगरासारखे आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी त्यांना राबून घेतात.आता दिवाळी जवळ आली आहे तरीही मानधन मिळाले नाही.यामध्ये काम करण्याऱ्या महिला ह्या अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत काहींचा तर उदरनिर्वाह त्याच्यावर आहे.तेव्हा आरोग्य मंत्र्यांनी त्यांचा अंत पाहू नये.
6 ऑक्टोबर रोजी संघटनेच्या शिष्टमंडळ सोबत मा मंत्रीमहोदयाची बैठक झाली दिवाळी आगोदर त्यांनी मानधन खातूअवर वर्ग लेल्या जेल असे सांगितले परंतु अजूनही जिल्हा लेवलवरही मानधन बजेट आलं नसल्याचे अधिकारी सांगतात बजेट आल्यावर ते वितरित करण्यास 8 दिवस जाणार तेव्हा ही दिवाळी आशा व गट प्रवर्तकांची दिवाळी उपाशीपोटी साजरी करावी लागनार असे दिसते
म्हणून आज अंबड येथील आशा गट प्रवर्तक मेळाव्यात 25 तारखेपर्यंत मानधन न मिळाल्यास आरोग्य मंत्र्यांचा जालना येथील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला तसे लेखी निवेदन तालुका आरोग्य अधिकारी कंगणे यांच्यामार्फत मंत्री महोदयाना आज देण्यात आले.
कॉम्रेड गोविंद आर्दड
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji