आज 26 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हा परिषद समोर आशा व गटप्रवर्तक यांनी थकित व वाढीव मानधन दिवाळीच्या पूर्व बँक खात्यात जमा करण्यात यावे याबाबत  निदर्शने जोरदारपणे करण्यात आले


 .22 तारखेच्या सरकारने काढलेल्या आदेशानुसार आशा व गटप्रवर्तक यांना केंद्र सरकारचा नियमित मिळणारा मोबदला तसेच 2000 व 3000 रुपये ची वाढ हे 31 ऑगस्ट पर्यंत मिळावे असे पत्र आले आहे परंतु मागच्या वर्षीच्या अनुभवा वरून ही वाढ हातात मिळण्यासाठी दिवाळी झाल्यावर दोन महिन्यानंतर ही वाढ आपल्याला हातात मिळाली ,यावर्षी सुद्धा पत्र येऊन सुद्धा ही वाढ व थकीत मोबदला आपल्याला हातात कधी मिळेल हे सांगता येत नाही कारण गटप्रवर्तक यांच्याकडून मागणी घेऊन तालुका ऑफिसला एकत्र करून  त्यानंतर tho ऑफिस ही मागणी जिल्हा परिषद ला करणार करणार व जिल्हा परिषद ही मागणी ची रक्कम तालुक्याला वर्ग करून तुमच्या सर्वांच्या खात्यावर पडणार या प्रक्रियेला किती वेळ लावतील हे माहीत नाही त्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने जिल्हा  26 ऑक्टोबरला आंदोलन करण्याचे ठरवले आहे या आंदोलनात पुढील प्रमाणे मागण्या कराव्यात 

1. आशा व गटप्रवर्तक यांना पाच महिन्यापासून थकित असलेला मोबदला त्वरित मिळावा,

2. एप्रिल  पासून दोन हजार व तीन हजार ची वाढ थकीत आहे ती त्वरित मिळावी.

3. सरकारने काढलेल्या पत्रानुसार थकित वाढ व मोबदला 31 ऑक्टोबर पर्यंत न मिळाल्यास 1 नोव्हेंबर पासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल 

4. जून 2021 च्या संपात आशांना 1500 रुपये व गटप्रवर्तक याना 1700 रुपयाची वाढ केली आहे परंतु या वाढीचा  उल्लेख आत्ताच्या पत्रात नाही त्यामुळे ही वाट सुद्धा त्वरित मिळावी.

5.  जूनच्या संपात मागणी केल्याप्रमाणे रेकॉर्डकीपिंग  4 head साठी असणारे चे दोन हजार रुपये यात कोणतीही कपात करणार नाही असे आश्वासन दिले होते परंतु आत्ताच्या पत्रामध्ये मिटींगला उपस्थित उपस्थित न राहिल्यास 150 रुपये कपात करावे अशा सूचना दिल्या आहेत, केंद्र सरकारच्या दोन हजार रुपये मधून काही रक्कम कपात झाल्यास राज्य सरकार सुद्धा ही रक्कम ते देत असलेल्या दोन हजार रुपये मधून कपात होणार आहे त्यामुळे 4 head साठी असणारे 2000 रुपये यामधून कोणती रक्कम कपात करू नये.

6.नवीन कामावर घेतलेले आशांना दोन वर्षापासून कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग दिलेली नाही त्यासाठी त्यांचा मोबदला व वाढ देण्याचे थांबू नये इतर आशा सोबत त्या आशाना सुध्दा मानधन वाढ मिळावी

7)आशा व गटप्रवर्तक यांचे ग्रामपंचायत स्तरावरील थकित कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे 

8)आशा व गटप्रवर्तकांना भागात काम करत असताना लोकांच्या कडून मारहाणीचे प्रकार घडत आहेत पण त्यांच्या पाठीशी अधिकारी उभे राहत नाहीत.

9)शहरी भागातील आशांचे 1750/1800  मानधन दिले जाते ते 2000 पूर्ण मानधन दिले जावे
आपले नम्र

मिना कोळी         उमेश देशमुख           हणमंत कोळी  शबाना आगा ,लता जाधव,सुवर्णा सणगर,आशा शिंदे ,शितल कोळी, वर्षा ढोबळे,राजश्री सुतार, धनश्री यादव,सरिता पवार,