जत :- आज जत नगरपरिषद समोर आशांचे थकित कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा याबाबत थाळीनाद आंदोलन करण्यात येणार होते पण जत नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा महेश वाघमोडे साहेब यांनी आशांचे थकित कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता १० महिण्या पैकी ५ महिण्याचे कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ताचा आज चेक काढण्यात येईल असे सांगितले आहे जत शहरामध्ये 33 आशा स्वंयमसेविका आहेत त्या या दोन वर्षापासून कोरोना च्या महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत .म्हणून शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर म्हणजे नगरपरिषद च्या वतीने कोरोना कामासाठी म्हणून दर महिण्याला १००० प्रोत्साहन भत्ता देयचे आहे आपल्या नगरपरिषद ने नोव्हेंबर2020 महिण्यापर्यंत कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता दिला गेला आहे व  डिसेंबर ते एप्रिल महिण्यापर्यंत थकित मानधन चा चेक आज बँकेत जमा केला आहे .असे सांगण्यात आले आहे .कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता मिळावा म्हणून गेले वर्ष भरापासून  पाठपुरावा पालकमंत्री,जिल्हाधिकारी,यांच्या कडे करण्यात आला आहे .या पाठपुराव्याला यश आले आहे यावेळी , जत नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष आप्पा पवार ,अशोक बन्नेनावर , कॉ  हणमंत कोळी ,आशा स्वंयमसेविका ललिता सावंत, रेश्मा शेख,सुजाता कवठे  व इतर सर्व आशा स्वंयमसेविका उपस्थित होत्या