*सांगली जिल्हा परिषद वर* 
 *14 फेब्रुवारी  लाटणे मोर्चा*

केंद्र व राज्य सरकारने आशा व गटप्रवर्तक यांना गेल्या तीन महिन्यापासून कोणत्याही प्रकारचे राज्य सरकार चे   केंद्र सरकारचे मानधन दिलेले नाही सर्व आशा व गटप्रवर्तक या मानधन न मिळाल्याने खुप त्रस्त आहेत व अशा अवस्थेत कामेही करत ,  संघटनेच्या वतीने वारंवार सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे तरीही सरकारने अजून आशा व गटप्रवर्तक यांचा मोबदला खात्यावर जमा केलेला  नाही, RTGS कार्यप्रणालीचे काम चालु आहे,फंड आला नाही अशी वेगवेगळी कारणे देऊन आशा व गटप्रवर्तक यांचे मानधन एक  एक दिवस पुढे जात आहे त्यामुळे कृती समितीने या सगळ्याचा विचार करून  महाराष्ट्रात सर्वत्र एकाच दिवशी आंदोलन करण्याचे ठरवले आहे त्याप्रमाणे आज सांगली जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी सांगली जिल्हा परिषदेवर लाटणे व थाळी घेऊन मोर्चा काढण्यात आला आहे .
यावेळी मिना कोळी, उमेश देशमुख, हणमंत कोळी ,सुरेखा  जाधव, अंजूम नदाफ, वर्षा ढोबळे, मयुरा पारथनळी ,ऋतुजा पाटील, शबाना आगा,सिमा गायकवाड,वंदना साठे,वैशाली पवार,हेमा इमन्नावर,सुनंदा सातपुते, वनिता भुसनूर,संगिता माळी, ललिता जाधव,अरुणा कदम,सरिता पवार, अलका पाटील ,सुनंदा इनामदार, इ सर्व जण उपस्थित होते