*महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक फेडरेशन ( सीआयटीयू ) ने घेतलेल्या निर्णयानुसार वेळोवेळी आंदोलन व निवेदन देऊन सुद्धा राज्य शासनाने स्वतः मंजूर केलेला निधी देण्याकरता टाळाटाळ करण्यात येत आहे.याबाबत आज सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. व सांगण्यात आले कि 27 तारखेच्या पल्स पोलिओ लसीकरणावर बहिष्कार टाकला जाणार आहे कोरोणाच्या संकटात सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचवणे व लागोपाठ विविध सर्वे करून माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आशा वर्कर करत राहिल्या केंद्राने तर कोणताही निधी मंजूर केला नसून राज्य शासनाने मंजूर केलेला निधी सुद्धा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. पोलिओ लसीकरण मोहीम राबवत असताना अल्प मोबदला देण्यात येतो.तो किमान ३०० रू. रोज देण्यात यावा*
*२५ फेब्रुवारी पर्यंत थकित मानधन न दिल्यास खालील प्रमाणे विविध मागण्याला घेऊन पोलिओ लसिकरनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला*
१)आशा व गटप्रवर्तक यांचे १ जुलै २०२१ मध्ये मानधन वाढ करण्यात आली होती ती लवकरात लवकर देण्यात यावे
२)आशा व गटप्रवर्तक यांचे ग्रामपंचायत स्तरावरील कोरोना कामाचा थकित प्रोत्साहन भत्ता
देण्यात यावा.
३)आशा व गटप्रवर्तक यांच्या साठी मासिक मिटिंग साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात यावे
आपले नम्र
उमेश देशमुख ,मिना कोळी,हणमंत कोळी सुरेखा जाधव, शबाना आगा,अंजू नदाफ,सुवर्णा सणगर,मंजुषा सांळुखे,मयुरा लेंगरे,वर्षा ढोबळे, सिमा गायकवाड
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji