जत:- आशा व गटप्रवर्तक संघटनेचे १ पहिले जत तालुका अधिवेशन संपन्न. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून.आशा स्वंयमसेविका गिरीजा कांबळे व महादेवी आवटी या दोघींच्या हस्ते फोटो ला हार घालून जयंती साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्षा कॉ मिना कोळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर कॉ.कॉ हणमंत कोळी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाला . यावेळी नवीन तालुका कमिटी निवडण्यात आली .
लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन तालुका अध्यक्षा म्हणून अंजूम नदाफ यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष वैशाली पवार,आरती गेजगे, सचिव हेमा इमन्नावर,  सहसचिव ललिता जाधव,खजिनदार महानंदा हल्याळ व इतर सर्व सदस्य म्हणून निवड करण्यात आले यावेळी गिता बाबर,वनिता भूसनूर,संगिता माळी आशा शिंदे, सरिता पवार, कांता यादव,अनारकली नदाफ,मंगल माळी ,सविता मोडे,ललिता सावंत,नेहा भोसले, अश्विनी जगताप, लायव्वा तद्देवाडी,इ सर्व आशा उपस्थित होत्या.