कडेगाव :-आशा व गटप्रवर्तक संघटनेचे १ पहिले कडेगाव तालुका अधिवेशन संपन्न. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कडेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती मंदाताई करांडे यांच्या हस्ते फोटोला हार घालून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आले. यावेळी अध्यक्ष भाषणात मंदाताई करांडे म्हणाले की आशा व गटप्रवर्तक यांनी संघटने मध्ये आपले योगदान दिले पाहिजे जर तुम्ही संघटनेच्या पाठिशी राहाल तरच आपले कामे होतील संघटनेशिवाय पर्याय नाही असे त्यांनी आशा व गटप्रवर्तकांना सांगितले व मोलाचे मार्गदर्शन ही त्यांनी केले . व पुढे जिल्हा अध्यक्षा कॉ मिना कोळी यांनी सविस्तर आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन केले. यावेळी नवीन तालुका कमिटी निवडण्यात आली .
लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन तालुका अध्यक्षा म्हणून शबाना आगा यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष अरुणा कदम ,सचिव रुपाली महाडिक या सर्वांची निवड करण्यात आली व इ सर्व आशा व गटप्रवर्तक यांची सदस्य पदी निवड केली .यावेळी जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी, जिल्हा सदस्य सुरेखा जाधव, मंगल यादव,अनुराधा होलमुके,विद्या कांबळे, धनश्री कुंभार, विद्या उथळे,मंदाकिनी होनमाने ,मेघा थोरात, संगिता पवार, पुजा शेटे, इत्यादी सर्व जण उपस्थित होते
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji