लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियन जि. सांगली

जि. प. मुख्य कर्यकारी अधिकारी मा. श्री. जितेंद्र डुड्डी यांचा मानपत्र देवुन युनियनच्या वतीने सन्मान...
लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियन जि. सागली या युनियनच्या वतीने सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देवुन जि. प. मुख्य कर्यकरी अधिकारी तथा प्रशासक  मा. श्री. जितेंद्र डुड्डी यांच्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे,जिल्हा आरोग्य अधिकारी मा.दिलीप माने,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मा .मिलिंद पोरे,जिल्हा प्रजनन व बालसंगोपन अधिकारी मा विवेक पाटील,डी पी एम विनायक पाटील, या सर्वांचा सत्कार करण्यात आला. 
सांगली जिल्ह्यातील सर्वच आशा व गटप्रवर्तकांना जि.प. च्या सेस फंडातुन मेडीक्लेम ही योजना चालु करुन दोन आशा वर्कर्सना त्या योजनेचा लाभ मिळाला.  या अत्यंत महत्वाच्या आणी आशा व गटप्रवर्तकांना लाभदायी ठरणारी योजना सुरु करण्यासाठी वरील सर्वच अधिकारी व पदाधिकारी यांनी अत्यंत चांगली भुमिका बजावली म्हणुन त्यांना सन्मान पत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना मा. श्री. डुडी म्हणाले की कोवीड काळात आशा व गटप्रवर्तक यांनी चांगली भुमीका बजावल्यामुळेच ही कोवीडची सात आटोक्यात आणण्यास आम्ही यशस्वी ठरलो. ईथुन पुढे देखील जी सर्वे करण्याची कामे आहेत, ती सर्वांनीच जबाबदारीने पार पाडावीत. यासाठी माझ्याकडुन जे सहकार्या लागेल ते सहकार्य करण्यास माझे सर्वच अधिकारी तयार आहेत. यावेळी जि. प. च्या माजी अध्यक्ष मा. प्राजक्ता कोरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा वेळी 
कॉ उमेश देशमुख ,कॉ रेहाना शेख,मिना कोळी, हणमंत कोळी सुरेखा जाधव, अंजू नदाफ,शबाना आगा,सुवर्णा सणगर,मयुरा पारथनळी, रुपाली महाडिक,सुनिता करपे,वर्षा ढोबळे,