सांगली : सिटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे तिसरे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक सात व आठ मे रोजी वर्धा येथे संपन्न झाले. सदर अधिवेशनात 19 पदाधिकारी सर्वांच्या मंजुरीने व एक मताने निवडण्यात आले. तसेच 74 जणांची नवीन राज्य कार्यकारणी मंजूर करण्यात आली त्या राज्य कमिटीमध्ये सांगली जिल्ह्यातील तीन लढाऊ रणरागिनी यांचा समावेश असून सांगली जिल्ह्यातील कॉ.मिना कोळी यांची राज्य सचिव पदी निवड झाली तर राज्य कमिटी सदस्य म्हणून सुरेखा जाधव व सुवर्णा सणगर यांची राज्य कमिटी सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. सदरील अधिवेशनात राज्य अध्यक्षपदी कॉम्रेड आनंदी अवघडे सातारा तर महासचिव म्हणून का पुष्पा पाटील सोलापूर यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लढाऊ महिला पुढारी कॉ.मिना कोळी कॉ.सुरेखा जाधव व सुवर्णा सणगर यांची राज्य कमिटीवर पदाधिकारी व सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिन्ही महिला पुढाऱ्यांचा संयुक्त सत्कार सांगली जिल्हा कमिटीच्या वतीने लवकरच करण्यात येणार असल्याचे कॉ उमेश देशमुख व कॉ हणमंत कोळी यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji