CITU संलग्न *लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक* *युनियन जि. सांगली.
आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नासाठी लढा तीव्र करा....कॉ. आनंदी अवघडे
महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक तुटपुंज्या मानधनावर काम करत असून त्यांच्या मोबदल्यात महागाईच्या प्रमाणात वाढ झाली पाहीजे. यासाठी लाल बवट्याच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभा करण्याचे अवाहन कॉम्रेड आनंदी अवघडे यांनी केले . त्या आज युनियनच्या 1ल्या अधिवेशनात बोलत होत्या. आज मार्केट यार्ड सांगली येथील वसंत दादा पाटील सभागृहात लाल बावटा आशा व गट प्रवर्तक युनियन चे पहिले जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. सुरवातीस क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस कॉ. आनंदी अवघडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अधिवेशनाचे उद्घाटन झाले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कॉ. मिना कोळी होत्या. प्रास्ताविक व स्वागत मयुरी लेंगरे यांनी केले. अधिवेशनासाठी जिल्ह्यातील पाचशे पेक्षा जाआशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या. यावेळी बोलताना कॉ. पडलवार पुढे म्हणाल्या की देशात 10 लाख आशा व गटप्रवर्तकांची संख्या असुन कोरोनासारख्या महामारीत यांनीच देशातील जनतेला आधार दिला त्यामुळे यांना मिळणाऱ्या मोबदल्यात भरघोस वाढ झाली पाहीजे, त्यासाठी जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येनी सहभागी सीटु प्रणीत युनियन मध्ये सहभागी झाले पाहीजे.उद्घाटनपर भाषणात कॉ आनंदी अवघडे यांनी युनियन च्या आजपर्यंतच्या लढ्याची माहीती दिली . यावेळी किसान सभेच्या वतीने कॉम्रेड उमेश देशमुख, जनवादी महिला संघटनेच्या रेहाना शेख, एसएफआय च्या वतीने तुळशीराम गळवे, आंगणवाडी युनियन च्या वतीने आशा माळी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाठीमागील कामाचा अहवाल काॅ. हणमंत कोळी यांनी मांडला. यावर उपस्थित प्रतिनिधींनी चर्चा केली. त्यानंतर अहवाल एकमताने मंजूर करण्यात आला. यानंतर नविन जिल्हा कमिटी तयार करण्यात आली. मीना कोळी यांची अध्यक्षपदी तर लता जाधव यांची सचिवपदी निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून काॅ. उमेश देशमुख, अंजूम नदाफ आणि सहसचिव म्हणून सुरेखा जाधव, शबाना आगा यांची निवड झाली. तसेच कोषाध्यक्ष म्हणून काॅ. हणमंत कोळी यांना निवडण्यात आले. शेवटी अध्यक्षीय समारोप मीना कोळी यांनी केला.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji