आज महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कर्मचारी कृती समिती वतीने आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड मोठे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. राज्य भरातून सर्व जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक सहभागी होत्या. जिल्ह्या जिल्ह्यातून आलेल्या आशा व गटप्रवर्तकां नि आपल्या भाषणातून प्रश्न मांडले. दुपारी कृती समितीचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य चे आरोग्यमंत्री मा. ना. तानाजी सावंत, आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, आरोग्य अभियान संचालक अतंत्रिक सरवदे साहेब व अधिकारी सोबत मंत्रालयात चर्चा झाली. आशा व गट प्रवर्तक ना भाऊबीज भेट संदर्भात मा. उप मुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय शी विचार विनिमय करण्याचा व त्यांच्या सोबत कृती समितीची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. सदर विषय आर्थिक असल्याने त्वरित निर्णय घेता येत नाही. असे म्हणाले. तसेच गेल्या संप काळात आरोग्यमंत्री महोदय यांनी किमान वेतन बाबत आशा व गट प्रवर्तक च्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी यशदा मार्फत कमिटी करण्याचे आश्वासन दिले होते. या बाबत फाईल तयार आहे. कार्यवाही केली जाईल असे नमूद केले. गट प्रवर्तक वेतन सुसूत्रीकरण बाबत विस्तृत चर्चा झाली. या बाबत अभ्यास करून भूमिका राज्य सरकारने घ्यावी. व गट प्रवर्तक वरील अन्याय दूर करावा. असे शिष्टमंडळाने सांगितले आहे. शहरी आशा व गट प्रवर्तक ना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे दररोज सह्या करण्याची सक्ती संदर्भात पत्रक काढण्याचे आश्वासन दिले. इतर मागण्या बाबत लेखी उत्तर देऊ ही भूमिका घेतली.
त्या नंतर रवींद्र नाटय मंदिर येथे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी साठी शिष्टमंडळ गेले. मात्र त्या ठिकाणी भेट होऊ शकली नाही.
या नंतर कृती समिती पदाधिकारी बैठक घेण्यात आली. बैठकीत वरील भूमिका घेऊन पाठपुरावा करावा. जर भाऊबीज भेट दिली नाही तर भाऊबीज च्या दिवशी मा. मुख्यमंत्री महोदय ना ओवळण्यासाठी आशा व गट प्रवर्तक जातील. व आमदार खासदार मंत्री महोदय ना राज्यभर आशा व गट प्रवर्तक ओवळण्याचे आंदोलन करून भाऊबीज मागतील असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. याची सर्वानी नोंद घ्यावी
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji