सांगली :- लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने आज जिल्हाधिकारी मा. डॉ राजा दयानिधी  यांचा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .त्याच बरोबर आशा स्वयंसेविका यांच्या प्रश्नाबाबत ही निवेदन देण्यात आले या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की आशा स्वयंसेविकांना बी एल ओ चे काम काही ठिकाणी सक्तीने लावले जात आहेत ते लावण्यात येऊ नये आशा स्वयंसेविका या मानधन तत्वावर काम करत असतात तसेच जिल्ह्यातील नगरपालिका नगरपरिषद यांच्या कडील कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता गेले वर्ष भर दिला गेला नाही तो लवकरात लवकर देण्यात यावा .तसेच अन्य एक निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ही देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने आभा  कार्ड काढण्यासाठी आशा स्वयंसेविकांना सक्तीने कामे लावली जात आहे विना मोबदला कोणतेही काम लावण्यात येऊ नये असे पत्र असताना आशांना कामे लावली जात आहे त्यांच बरोबर NCD  चे काम पूर्वी ऑफलाइन केला असता आता तेच काम परत ऑनलाइन करण्यासाठी सांगितले जात आहेत असे अन्य मागण्या चे दोन वेगवेगळे निवेदन संघटनेच्या वतीने आज देण्यात आले यावेळी कॉ हणमंत कोळी ,सुरेखा जाधव विनायका शेटे , प्रिती सावंत इ सर्व जण उपस्थित होते