लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियन जि.सांगली
आशा व गटप्रवर्तकांना पालकमंत्र्यांच्या घराकडे जात श असताना पोलीसानी अडविले पोलीसांसोबत महिलांची झटापट....
आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी भाऊबीज व वेतन वाढ मिळावी, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करा, त्यांच्या कामावर आधारित मोबदला दुपटीने वाढवा त्यांना मोबदला नव्हे तर किमान वेतन द्या त्यांना मातृत्व कालीन रजा द्या अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी मंत्रालय वर ११/१०/२०२२ रोजी प्रचंड मोर्चा काढला होता.
त्यादिवशी गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या प्रतिनिधी ची मा आरोग्य मंत्र्यांशी वरील मागण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती त्यावेळी मा आरोग्य मंत्री मा.मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत दिवाळी पूर्वी निर्णय जाहीर करु असे स्पष्ट व ठोस आश्वासन त्यांनी दिले होते पण त्यांचा काय निर्णय झाला नाही त्यामुळे आम्ही गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.डॉ. सुरेश भाऊ खाडे त्यांच्या निवासस्थानी ओवाळणी कार्यक्रम करण्याचा निर्णय जाहीर केला होता, परंतु पालकमंत्री मुंबईस गेल्यामुळे त्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक त्यांच्या घराकडे जात असताना पोलीसांनी कडे करुन महिलांना अडविले. त्या ठिकाणी काही काळ पोलीसांची झटापटही झाली. शेवटी त्याच ठिकाणी घोषणाबाजी केल्यानंतर सहा.कामगार आयुक्त श्री. गुरव साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहीले. त्यांनी निवेदन स्विकारुन पालक मंत्री सांगलीत आल्यानंतर त्यांची चर्चे साठी वेळ घेण्यात येईल. असे अस्वासन दिले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली. आंदोलनाचे नेतृत्व उमेश देशमुख, मिना कोळी ,हणमंत कोळी,लता जाधव, सुरेखा जाधव, शबाना आगा,सुवर्णा सणगर, सिमा गायकवाड, अरुणा कदम,वैशाली पवार, वर्षा ढोबळे,रेशमा शेख,वर्षा देशमुख,इ. नी केले.
#लाल_बावटा_आशा_वर्कर्स_व_गटप्रवर्तक_युनियन
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji