सांगली:- आरोग्य सेवेत आशा गटप्रवर्तक यांचे योगदान मोलाचे आहे भविष्यात आरोग्य सेवेत त्यांची गरज लागणार आहे त्यामुळे त्यांना सेवेत कायम करावे या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अशी मागणी करून लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा जितेंद्र डुडी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे त्यात म्हटले आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान हे स्थायी करून त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी ४५ व्या ४६व्या भारतीय कामगार परिषदेच्या शिफारशी नुसार आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करावे, किमान वेतन२६ हजार लागू करावे, कामगार आधारित मोबदल्यामध्ये वाढ करावी, प्रसुती व आजारपणासाठी पगारी रजा मंजूर करावी, गंभीर आजारपण व अपघाती विमा लागू करावा कोरोनात मृत्यू झालेल्या आशा व गटप्रवर्तकांच्या कुंटुंबियांना ५०लाख रूपयांचा विमा द्यावा आरोग्य कर्मचारी यांच्या कडून होणारी पिळवणूक थांबवावी आरोग्य वर्धिणीचा लाभ लागू करावा .
 या निदर्शनास  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सेक्रेटरी कॉ रेहाना शेख यांनी या पाठिंबा दिला .यावेळी जिल्हा अध्यक्ष मिना कोळी ,  लता जाधव,कॉ हणमंत कोळी ,सुरेखा जाधव ,शबाना आगा,अंजूम नदाफ, शांता जाधव,अरुणा कदम,वैशाली पवार, हेमा इमन्नावर ,शितल कोळी,सिमा गायकवाड, विमल जाधव, राणी चव्हाण, माणिक घाडगे, सुनंदा सातपुते, गिता बाबर,ललिता जाधव,आशा शिंदे, संगिता माळी ,रेश्मा शेख,वर्षा देशमुख यांच्या सह आशा गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.