डफळापूर :- आज डफळापूर येथे कोसळले बस स्थानक नवीन बांधण्यात यावे व अन्य मागण्या साठी डफळापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी सर्कल अंजली निमसोड व परिवहन मंडळाच्या आगार प्रमुख यांना कॉ हणमंत कोळी व आजी माजी सैनिक सेवा भावी संस्था यांच्या वतीने हे मागण्याचे निवेदन देण्यात आले.
डफळापूर हा 25 गावाचा केंद्र बिंदू असलेल्या जत सांगली रस्त्यावरील डफळापूर येथे 1967साली बसस्थानक बांधण्यात आले आहे. आतापर्यंत संबंधित अधिकारी यांनी गेल्या अनेक वर्षात कधीही या बस स्थानकाची एकदाही दुरुस्ती केली गेली नाही .त्यामुळे दुर्लक्षित असलेल्या या बस स्थानकाचीहे पडझड झाली आहे संबधित अधिकाऱ्याच्या दुर्लक्ष पणामुळे बसस्थानक कोसळले आहे. सध्या स्थितीत प्रवाशांना गाडीची वाट पहात रस्त्याकडे ला उभे रहावे लागते आहे तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने नवीन बसस्थानक बांधण्यात यावे व सध्या जत तालुक्यावर दुष्काळाचे सावट पडले आहे शेतकरी हवालदिल झाला आहे विहिरी ने पाण्याचा तळ गाठला आहे म्हणून जत तालुक्यातील हा दुष्काळ जाहीर करण्यात या अनेक मागण्या याबाबत डफळापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी कॉ हणमंत कोळी,मेजर दिलीप जाधव, शिवाजी नाईक, अनिल माने, मधुकर कदम, इलाई नदाफ, बाबासो शिंदे,जयवंत सवदे वसंत बंडगर,बसगोंडा माळी,गौस मकानदार,व सर्व आजी माजी सैनिक व ग्रामस्थ यावेळी विविध पक्ष संघटना यांनी पाठिंबा आपला जाहीर केले यामध्ये खलाटी गावच्या सरपंच लता देवकते,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे बी आर पाटील, माजी मार्केट कमिटी सदस्य अभिजित चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन चव्हाण,स्वाभिमानी शेतकरी संघटना सागर चव्हाण, दिपक कांबळे,सोसायटी संचालक मन्सूर नदाफ,धनाजी चव्हाण,रमेश शांत,बबन मकानदार,अमित उबाळे या सर्वांनी पाठिंबा दिला
१) डफळापूर येथील पडझड झालेले बस स्थानक सुसज्ज बांधण्यात यावे
२) जनावरांच्या साठी चारा डेपो चालू करण्यात यावे
३) शेतकऱ्यांच्या वर दोबारा पेरणी चे संकट उभे राहिले आहे तरी पंचनामे करून भरपाई देण्यात यावी
४) शेतकऱ्यांचे जमीन कॅनल मध्ये गेलेल्या भूसंपादन कायदा नुसार 5 पट भरपाई देण्यात यावी
५) डफळापूर तलाव कोरडा पडला आहे तो म्हैसाळ कॅनल चे पाणी सोडून भरून देण्यात यावा
६) राज्य महामार्ग डफळापूर ते अनंतपूर या रस्त्याचे उर्वरित कामाला लवकर मंजुरी देण्यात यावी
७) डफळापूर एम एस ई बी स्टेशन वर पडणारा लोड कमी करुन अंकले सब स्टेशन चे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji