सांगली :- आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये यासाठी आज लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने सांगली जिल्हा परिषद वर मोर्चा काढण्यात आला या मोर्चा ची सुरुवात आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हा परिषद पर्यंत मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकारी मा तृप्ती धोडमिसे यांना  निवेदन देण्यात आले व पुढे निवेदनात असे मांडण्यात आले आहे कि 
केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तक यांना  NRHM मधून सध्याचे एनएचएम NHM मधून मोबदल्यावरचे कर्मचारी म्हणून 2006- 2007 पासून त्यांची नियुक्ती केली आहे त्यांची नियुक्ती करताना 7वी, 8वी पास असलेल्या आशांना सुद्धा यामध्ये आशा स्वयंसेविका म्हणून नेमणूक केली आहे व त्या तेव्हापासून मोबदल्यावरचे कर्मचारी म्हणून काम करत आहेत त्यांना इंग्रजीचे आणि मोबाईलचं पुरेसा ज्ञान नाही असे असताना सुद्धा आशांना ऑनलाइन कामे सक्ती ने लावली जाते आहे. व अन्य मागण्या साठी आशा  व गटप्रवर्तक या 16 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. असे या निवेदनाद्वारे इशारा देण्यात आले आहे
 
 

खालील प्रमाणे मागण्या

१) गटप्रवर्तकांचे सरकारी सेवेत समायोजन करा

२) आशांना 2000 /- व गटप्रवर्तकांना 3000/-भाऊबीज दिवाळी बोनस द्या

३) आशांना ऑनलाईन कामाची सक्ती लावण्यात येऊ नये

4) आशांचे शासकीय सेवेत समायोजन करा

5) आभा कार्ड व गोल्डन कार्ड , ई केवायसी चे कामे सेतू केंद्र मार्फत काढण्यात यावे

6) शहरी भागातील  आशा स्वयंसेविका यांचे यु एच एन डी च्या मिटिंग घेण्यात यावे

7) गटप्रवर्तकांना सॉफ्टवेअर भत्ता देण्यात यावा
 
या आमच्या प्रमुख मागण्या आहेत तरी ते सोडविण्यात यावे ही नम्र विनंती

आपले नम्र

 कॉ उमेश देशमुख, कॉ रेहाना शेख, कॉ मिना कोळी, कॉ हणमंत कोळी, लता जाधव, सुरेखा जाधव, अंजूम नदाफ, शबाना आगा, सुवर्णा सणगर,मंजुषा सांळुखे, वर्षा ढोबळे,