डफळापूरमध्ये बांधकाम कामगारांचा मेळावा संपन्न
मंजूर लाभ योजनेच्या कामगारांना प्रतिकात्मक चेकचे वाटप
डफळापूर : जत पश्चिम भागातील बांधकाम कामगाराच्या मुलांचे विवाह व शिक्षणासाठी मंजूर रक्कमेच्या प्रतिकात्मक चेकचे वाटप करण्यात आले. लाल बावटा बांधकाम कामगार संघटना सांगली यांच्यावतीने डफळापूर येथे चेकवितरण व मार्गदर्शक मेळावा संपन्न झाला.
यावेळी सोसायटी संचालक परशुराम चव्हाण,संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,सेवानिवृत्त शिक्षिका सौ अलका पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ मनिषा कांबळे, गंगाधर शिंदे, जावेद नदाफ, सदाशिव कित्तुरे, मंगल कोळी, वैशाली चव्हाण,
परशुराम चव्हाण म्हणाले,डफळापूर परिसरातील बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेतून मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देण्यात कॉ.हणमंत कोळी व कॉ.मिना कोळी या दांपत्याचा मोठा वाटा आहे,त्यांच्यामुळे ही योजना या भागातील कामगारांना समजू शकली आहे.मंडळाकडे जमा असलेल्या निधीतून जास्तीत जास्त कामगारांना मेडिक्लेम, घरकुल, उच्च शिक्षणासाठीचे लाभ, ६० वर्षावरील नोंदीत बांधकाम कामगारांना पेन्शन यासारख्या महत्त्वपूर्ण योजना शासनीने तत्काळ द्याव्यात अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.कॉ.कोळी दांपत्याला सहकार्य करत राहू.
कॉ.हणमंत कोळी म्हणाले,शासनाच्या बांधकाम महामंडळाकडून अनेक योजना कामगारांना दिल्या जात आहेत.आम्ही डफळापूर परिसरात गेल्या दोन वर्षात २ हजारावर कामगारांना लाभ मिळवून दिला आहे.विविध लाभासाठी कामगारांची प्रत्येक वर्षी नोंदणी गरजेची असते.त्यामुळे वर्ष पुर्ण झालेल्या कामगारांनी नव्याने नोंदणी करावी,नोंदीत बांधकाम कामगारांना मुलांचे शिष्यवृत्तीसह वेगवेगळ्या लाभाचे फार्म भरणे गरजेचे आहे.तरचं कामगारांच्या या कल्याणकारी योजनेचे लाभ मिळू शकतील.नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी
30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य,बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य ,बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना,प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना,प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,अटल पेन्शन योजना लाभ,कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा,कौशल्यवृद्धी योजना लाभ ,बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ ,नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा,बांधकाम कामगार व त्याच्या पाल्यांसाठी Essentional Kit चे वाटप,प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना अशा लाभाच्या योजनाचे लाभ मिळू शकतात.
संघटनेच्या माध्यमातून डफळापूर परिसरातील बांधकाम कामगार यांच्या पाल्यांचे वैद्यकीय शिक्षण व इतर लाभाचे फॉर्म मंजूर झाले आहेत त्यांच्या प्रतिकात्मक चेकचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कॉ.मिना कोळी यांनी स्वागत,प्रास्ताविक व आभार मानले.
यांना मिळालेत लाभ
- सदाशिव कित्तुरे मुलींच्या लग्नासाठी चा लाभ ५१ हजार रुपये
- शशिकांत बोराडे मुलींच्या लग्नासाठी चा लाभ ५१ हजार रुपये
- उध्दव शिंदे यांच्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी चा लाभ १ लाख रुपये
- सागर कोरे यांच्या पत्नीला डिलिव्हरी साठी चा लाभ १५ हजार रुपये
- घागरे यांच्या मुलींच्या वैद्यकीय शिक्षणासाठी चा लाभ १ लाख रुपये
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji