लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सांगली येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालय बांधकाम कामगार यांना दिवाळी बोनस देण्यात यावे यासाठी कॉम्रेड हणमंत कोळी व कॉम्रेड रेहाना शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली नयावेळी असे निवेदनात म्हटले आहे की आपल्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 22 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत, तसेच मंडळाकडे राज्यातील सर्व जिल्ह्यातून लाखो कामगार नोंदीत आहेत, गेल्या वर्षी म्हणजे 2024 साली आमच्या बांधकाम फेडरेशन ने सांगली येथील कामगार मंत्री महोदय याच्या कार्यालयावर हजारो बांधकाम कामगारांचा मोर्चा काढून 10 हजार रुपये बोनस ची मागणी केली होती, मात्र ऐनवेळी विधानसभा निवडणूक लागल्याने घोषित केलेला 5000 रुपये बोनस राज्यातील एकाही कामगारांना मिळाला नाही, त्याचा प्रचंड राग आजही बांधकाम कामगारांच्या मनामध्ये आहे. आपल्या सरकारने बोनस ची घोषणा करूनसुद्धा त्याची अंमलबजावणी केलेली नाही. ही कामगारांची शुद्ध फसवणूक आहे.तसेच गेली 2 महिने नोंदणी नूतनीकरणाचे काम ठप्प आहे, सप्टेंबर 2024 पासून लाभाचे अर्ज पेंडिंग आहेत, जुलै 2025 पासून RO नी या लाभाच्या अर्ज तपासणीवर बहिष्कार घातला आहे. रिनिवल चे सर्व अर्ज विनाकारण आणि काही चुकीच्या त्रुटी काढून रिजेक्ट केले जात आहेत, नवीन आणि रिनिवल अर्ज व्हेरिफीकेशनसाठी 5 ते 6 महिन्याच्या तारखा पडत आहेत, घरकुल चे अर्ज वेळेत तपासले जात नाहीत एकूणच सर्व अधिकारी ही कामे करणेस टाळाटाळ किंवा विलंब लावत आहेत, म्हणून राज्य सरकार आणि मंडळाच्या या कामगार विरोधी भूमिके विरोधात खालील मागण्या करीत आहोत.
1) 2025 च्या दिवाळीत बांधकाम कामगारांना 15000 रुपये बोनस मिळाला पाहिजे.
2) गेली दोन महिने बंद असलेले नोंदणी, नूतनिकरण आणि लाभाची प्रकरणे दिवाळीपूर्वी निर्गत करा.
3) नवीन भांडी सेट देणेची कार्यवाही ताबडतोब चालू करा.
4) चुकीच्या त्रुटी काढणाऱ्या RO यांच्यावर दांडात्मक कारवाई करा.
5) घरकुल आणि लाभाचे अर्ज दिवाळी पूर्वी मंजूर करा.
यावेळी प्रकाश घारगे ,प्रशांत नाईक, समीर नराफ ,बसवराज स्वामी ,वृषभ कोळी अमीर जमादार ,निलेश पवार ,विजय कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji