आशा विनामोबदला निवडणुकीचे काम करणार नाही

जत:-जत नगरपरिषद च्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये बुरखाधारी महिला यांची ओळख पटवण्यासठी दि २/१२/२०२५ रोजी आशा वर्कर्स यांना ड्युटी लावण्यात येणार आहे याबाबत आज लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने तहसीलदार मा प्रविण धानोरकर  यांना निवेदन देण्यात आले आहे 
यामध्ये संघटनेच्या वतीने अशी अशी मागणी करण्यात आली आहे कि आशा वर्कर्स यांना त्या दिवसाचा निवडणूक भत्ता देण्यात यावे तसेच जेवण चहा नाष्टा इ सर्व सुविधा मतदान केंद्रावर पुरवण्यात यावे तरच आशा वर्कर्स या बुथवर काम करतील अन्यथा या कामावर बहिष्कार टाकला. जाईल असे मा तहसीलदार यांना सांगण्यात आले आहे   आशा वर्कर्स या रोजंदारीवर काम करतात त्या शासकीय कर्मचारी नाहीत त्यामुळे त्या निवडणूक कामामध्ये भत्ता देण्यात यावे आपण यामध्ये नियुक्ती पत्र दिले आहे यामध्ये १९५०चे कलम १३४ नुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले आहे असे  दबावाखाली आशा वर्कर्स काम करणार नाही व  त्या अल्प मानधनावर काम करतात तरी त्यांना निवडून कामाचा योग्य भत्ता दिला गेला पाहिजे  अन्यथा हे काम आम्ही करणार नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या