बाई गं...हुरळू नकोसं

बाई गं...हुरळू नकोसं
आज म्हणे तुझ्या गौरवाचा दिन आहे
तुझ्या कतृत्वाचे पोवाडे गाण्याचा दिन आहे
पण बाई गं..हुरळू नकोस
एक सवाल करच तू..एका दिवसाचा गौरव आणि आयुष्यभर गुलामी आमच्या वाट्याला का म्हणून ?

बाई गं...हुरळू नकोसं
आज तुझ्या मोठेपणाच्या बाता लंब्याचौड्या करून सांगितल्या जातील
व्याख्यान , परिसंवाद  अन् परिषदापण भरतीलं
पण बाई गं...हुरळू नकोसं
एक सवाल विचार त्यांना ..
आयुष्यभर तुझ्या तोंडाला वेसनं  कोण घालते म्हणून ?

बाई गं..हुरळू नकौसं
मोठमोठया पेपरातून छब्या तुझ्या झळकतील
वाँट्सअँप , फेसबुकवर फोटो तुझे लागतील
पण बाई गं...हुरळू नकोसं
एक सवाल करच त्यांना
मार्केटमधील प्राँडक्ट खपवायला तुझ्या तोंडाला रंगीवलं कुणी ?

बाई गं..हुरळू नकोसं
महिला सक्षमीकरणाचे नारे राज्यकर्ते लगावतील आज.
सामाजिक संघटना स्त्री पुरुष समतेचा घोषापण लावतील.
पण बाई गं..हुरळू नकोसं
विचार त्या सर्वाना एकच सवाल
तुझं अबलापणं आणि दुय्यमत्व आजवर रेघीले कुणी ?

बाई गं..हुरळू नकोसं
थोडा मान सन्मान आज तुझा होईलच खरा.
तुझ्या मुक्तीकरता गाईले जातील काही गीतही
पण बाई गं ..हुरळू नकोसं
आता एक प्रश्न स्वतःलाच कर..
पुरुषसत्ताक व्यवस्था आणि गुलामीच्या श्रुंखला तुझ्याशिवाय तोडणार कोण ?

बाई गं..हुरळू नकोसं
दिन गौरवाचा असला तरी प्रश्न विचारलेच पाहिजेत.
गौरवगाथा कुणीही गावोतं..तुला मुक्तीचे गीत गायलचं पाहिजे .
अशावेळी सखे...हुरळायचं नसतं
सावधं राहून स्वतःला जपायचं असतं
वखवखलेल्या नजरा आज तुझ्या देहावर टोच मारण्याचं थोडीच सोडणार आहेत ??

बाई गं...
सावध असं,
हुरळू नकोसं...

महिला दिन एक दिवसाचा नव्हे,
वर्षाचा नव्हे , शतकाचा नव्हे ...
युगानयुगाचा असावा !!


https://youtu.be/yJGR_QJXTa8

लाईक शेअर @सस्क्राईब करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या