सर्व आशा ताई आणि गट प्रवर्तक आपला आणि आपल्या कुटुंबियां चा जीव धोक्यात घालून या राष्ट्रीय आपत्ती मधे कोणतीही सुरक्षा नसताना काम करत आहेत.दीव्यांग सर्व्हेक्षण,आयुष्यमान असो, पूरपरिस्थिती सर्व्हेक्षण असो,दरवेळी माझ्या आशा ताई आणि गट प्रवर्तक त्याचा मोबदला मिळण्यासाठी न्याय मागतात.सप्टेंबर महिन्यात झालेल्या आंदोलन मधे माझ्या भगिनी सहित आमचे सर्व कॉम्रेड सुद्या भर पावसात आमच्याबरोबर आम्हाला न्याय मिळण्यासाठी 15 दिवस भर पावसात उभे राहिले.काही भगिनींनी तर अगदी शंख ध्यनी करून सरकार कडे न्याय मागितला आणि हतबल झाल्या.आणि इतकं होऊनही माझ्या सर्व भगिनी हे सगळ बाजूला सारून आता ह्या आपत्तीत काम करत आहेत.पण दिवसेंदिवस कोरोणा चा धोका वाढत चालला आहे. गट प्रवर्तक आणि आशा ताई सहित त्यांचे कुटुंबीय धास्तावलेले आहेत.आणि त्यात कहर म्हणजे 50 लाखाचा विमा सरकारने घोषित केला.आम्ही जिवंत असू पर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही त्यासाठी आमच्या मरणाची वाट पहावी लागणार.यासारखे दुसरे दुर्दैव काही नाही.सद्य स्थितीत त्वरित आम्हाला आमच्या कामाचा योग्य दाम आणि आमच्या कुटुंबीयांना पण विमा लागू करावा.नाहीतर गट प्रवर्तक आणि आशा भगिनी काम बंद करण्याच्या मनःस्थितीत आहेत.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji