*पोल्ट्री* *व्यावसायिक* *यांच्या* *नुकसान* *बाबत* *किसान* *सभेच्या* *वतीने* *मा.तहसीलदार यांचे मार्फत कृषी मंत्री व पशुसंवर्धन विभाग यांना यांना निवेदन देण्यात आले*
...........................................
*अखिल भारतीय किसान सभा नांदगाव खंडेश्वर*
👉🏾कोरोनाचा चिकनशी संबंध *असल्याच्या* भीतीमुळे *उध्वस्त* झालेल्या पोल्ट्री व्यवसायाला सहाय्य करण्याची किसानसभेची मागणी.
किसान सभा तालुका नांदगाव खंडेश्रर समनव्य समितीच्या वतीने यासंदर्भात मा. तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे कृषी मंत्री व पशुसंवर्धन यांना निवेदन देण्यात आले .कोरोना व्हायरस चिकन मधून पसरत असल्याची अफवा प्रसार माध्यमांमधून पसरविली गेल्याने तालुक्यातील व जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय प्रचंड अडचणीत सापडला आहे. ग्राहकांनी चिकन व अंड्यांकडे पाठ फिरविल्याने कोंबडीचे दर अत्यंत कमी झालेले आहेत.
✍🏻 पोल्ट्री व्यावसायीक शेतकरी यामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. १ किलो वजनाची कोंबडी तयार करण्यासाठी ७५ रुपये खर्च येतो. ३ किलो वाढ झालेल्या कोंबडीचा उत्पादन खर्च साधारणपणे २१५ रुपये असतो. अशा परिस्थितीत कोंबडीचे दर 50 रुपयांपेक्षा ही खाली कोसळल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय कोलमडून पडण्याच्या स्थितीत पोहचला आहे.
✍🏻 शेती परवडत नाही म्हणून तालुक्यातील व राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय सुरु केले.
✍🏻 अत्यंत कष्टाने व्यवसायाची घडी बसविली. आता मात्र केवळ एका अफवेने शेतक-यांच्या पोरांचे हे व्यवसाय उध्वस्त होताना दिसत आहेत.
✍🏻 पोल्ट्री व्यवसायावर राज्यातील लाखो कुटुंबांचा उदर निर्वाह अवलंबून आहे.
✍🏻 पोल्ट्री व्यवसायात कार्यरत असलेले लाखो मजूर, चिकन व अंडी वाहतूक व्यवसायिक, कटिंग, ट्रेडिंग व हॅचरी व्यवसायिक, पोल्ट्री आहार उत्पादक यांचा रोजगार पोल्ट्री व्यवसायावर अवलंबून आहे.
✍🏻 कोरोनाचा चुकीचा संबध पोल्ट्री व्यवसायाशी जोडला गेल्यामुळे या सर्वांच्या रोजगारावर भयानक कु-हाड कोसळली आहे.
✍🏻 सरकारने या पार्श्वभूमीवर पोल्ट्री उद्योग सावरण्याच्या दृष्टीने तातडीने पावले टाकावीत अशी मागणी किसान सभेने आज केली आहे.
✍🏻 चिकन किंवा अंडी खाल्ल्याने कोरोना होतो ही अफवा असल्याचे शासकीय स्तरावरून स्पष्ट करण्यासाठी व्यापक मोहीम घ्यावी.
✍🏻 अफवा पसरविणारांवर कारवाई करावी.
✍🏻सरकारने पोल्ट्री उद्योगाचे वीज बिल तातडीने माफ करावे.
✍🏻 पोल्ट्रीसाठी संकट काळात मोफत वीज पुरवावी.
✍🏻संकटात संपलेल्या पोल्ट्री धारकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. संकटात असलेल्या पोल्ट्री व्यावसायीकांच्या कर्जाचे संकट काळातील व्याज माफ करावे अशी मागणी किसान सभेने यावेळी केली आहे. किसान सभा जिल्हा सहसचिव शाम शिंदे, तालुका अध्यक्ष अनिल मारोटकर, सचिव दिलीप महल्ले,पोल्र्ट्री व्यावसायिक अथर खान, प्रल्हाद धवने, मनोज रावेकर, रमेश उडबगले, सलमान खान, शेख नवेद, आशीष रावेकर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji