आज सर्वपक्षीय कृती समितीच्या कोरोना आजारा बाबत प्रशासना सोबत सहकार्य आणि जनजागृती बाबत नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
या बैठकीला डॉ संजय सालुंखे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मार्गदर्शन केले.सांगली मध्ये आता पर्यंत घेण्यात आलेल्या सर्व चाचण्या नेगेटीव आल्याचे त्यानी सांगितले आहे.या शिवाय रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेली तयारी याबाबत त्यानी माहिती दिली.
पहिल्या आणि दूसऱ्या टप्प्यात एक ही रुग्ण सांगली जिल्ह्यात सापडला नसल्याचे या वेळी त्यानी सांगितले.
आता तिसऱ्या टप्प्यात सामूहिक प्रसार होण्याची शक्यता जास्त निर्माण होऊ नये म्हणून,
गरजे शिवाय घरा बाहेर पडू नये,
एकमेकांच्या सोबत हाताचा स्पर्श झाल्यावर साबनाने स्वच्छ हात धुवावा सेनिटाइजर वापरलाच पाहीजे असे नाही.घराबाहेर हात पाय धुन घरात प्रवेश करावा.खोट्या औषध आणि उपाय सांगणारे खोटे संदेश प्रसारीत करू नयेत.हा आजार बरा होऊ शंकत असल्याने घाबरून जाऊ नये, सदर आजाराचे विषाणू लोखंड आणि अवजड वस्तू वर जास्त काळ टिकतात अशी माहिती यावेळी त्यानी दिली.
शासनाचे सहकार्य करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना,जीवनावश्यक वस्तुच्या बाबत शासन पातळीवर एकवाक्यता कशी आणता येईल आणि विविध उपाय योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि योग्य खबरदारीसाठी शासनाला सहकार्य करुण लोकजागृतीसाठी उद्या सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आलेली आहे.
1) प्रशासनाला कोणत्या प्रकारे मदत आणि सहकार्य करता येईल याबाबत मार्गदर्शन करावे.
2) जीवनावश्यक वस्तुबाबत सूची तयार करणे ( किराणा व्यापारी,भाजीपाला व फळ विक्रेते, औषध व इतर महत्वाच्या गोष्टी),प्रशासनाकडून या वितरण पद्धती बाबत एकवाक्यता आणि नियोजन ठरवणे, तसेच या विक्रेत्यानी घ्यायची काळजी घोषीत करणे.
3) आर्थिक दुर्बल घटकांच्या बाबत व  रोजंदरीवर कार्यरत घटकासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजना बाबत तसेच त्याना पुरवायच्या माहिती व सुविधा बाबत नियोजन व उपाय योजना तयार करणे.
4) घंटा गाड़ीवरील ऑडियो मधून प्रत्येक भागात माहिती पोचावन्याचे नियोजन करणे.
5) मेडिकल दुकान बाहेर वाढीव दराने सेनिटाइजर व मास्क खरेदी करू नयेत तसेच covid 19 हा मास्क गरजेचा आहे अथवा तो कोणी वापरायचा याबाबत पत्रक घोषीत करणे.
6) शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चेक पोस्ट करता येईल अथवा कसे याबाबत नियोजन करणे.
7) धार्मिक आणि प्रार्थनास्थळा वरील ध्वनीक्षेपण यंत्रनेचा वापर घ्यायची काळजी व खबरदारी देण्यासाठी कसा करता येईल याबाबत नियोजन करावे.
8) आजार फैलावनार नाही यासाठी अजुन कोणत्या गोष्टी लोकसहभागातून पुढाकार घेऊन करता येतील याबाबत सूचना कराव्यात.
9) जिल्ह्यात स्वतंत्र संपर्क कक्ष तयार करुण विभागवार / तालुकनिहाय रचना करण्यात यावी