*मा आयुक्त*
*राष्ट्रीय आरोग्य अभियान*
*मुंबई.*
*विषय*: साथीच्या रोगाचे सर्वेक्षण करताना आशा स्वयंसेविकेच्या आरोग्या विषयी .
जगभरात थैमान घातलेल्या कोविड19 च्या साथीचे रूग्ण भारतात व विशेष करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सदर साथीच्या रुग्णाबाबत व तत्सम इतर रुग्ण उदा.इन्फ्लुएन्झा इत्यादीचा सर्व्हे करण्यासाठी आज शहरी व ग्रामीण भागात आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांना कामास लावण्यात आले आहे.
आपणास माहीतच आहे कीआज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कुष्ठ रोगापासून हत्तीरोगपर्यंत तसेच टीबी पासुन आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थीचे सर्व्हेचे काम आशा व गटप्रवर्तकांकडून करून घेतले जात आहे.आयुष्यमान भारत योजनेत आशाना कामाचा मोबदलाही दिला जात नाही. सदर वेगवेगळ्या कामांचा एका मागून एक सर्व्हे करत असताना त्यांच्यावर होणाऱ्या कामाच्या बोजाचा विचारच केला जात नाही हे अत्यांत खेदाने नमूद करावेसे वाटते.आरोग्य क्षेत्रातील इतर घटक मात्र ही सर्व सर्व्हेची कामे आशांच्या माथी मारुन आशानी मिळवलेल्या माहितीच्या आधारे स्वतःकाम केल्याचे दाखवत आहेत व तसा अहवाल वैदयकीय अधिकाऱ्यांमार्फत पाठवीत आहेत , हे कितपत योग्य आहे?
शासनाने आशानी एकत्रीतपणे एकावेळी किती कामे करावी व कोणकोणती कामे करावी याचा विचार केला आहे काय? आरोग्य विषयक तातडीची कामे आशा कर्मचारी तत्परतेने करतील यात शंका नाही.पण शासनास आशा कर्मचाऱ्यांनी आठवडयातून 3-4 दिवस तिचा उदरनिर्वाह सांभाळत किमान 2ते 3 तास कामे करावीत या शासन निर्णयाचा विसर पडला काय? असेच सध्या वाटत आहे.आज आरोग्यविषयची सर्व कामे शहर व गावपातळीवर आशाकडूनच करून घेतली जातात, हे कितपत योग्य आहे?
*"आशांची मदत घ्या"* या एका वाक्याने सर्व कामे तिच्याकडून बहुतांश वेळा कोणताही मोबदला न देता करून घेतली जात आहेत अशी अनेक कामे लादत असताना प्रशासन काहीही करत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे.अशी कामे करत असताना आशांच्या आरोग्यविषय सुरक्षतेचे काय? हा ही प्रश्न अनुत्तरीत राहतो.स्वाइन फ्लूचा सर्व्हे करताना रुग्णाच्या संपर्कात आल्याने गर्भवती आशा बाधित झाली व तिचा मृत्यू झाला, हे शासन विसरले आहे काय? आजही परिस्थितीचे गांभीर्य पाहुन आशा कर्मचारी काम करतील ही,पण त्यांना कोणती सुरक्षा देणार याचा तातडीचा प्रशासकीय निर्णय आवश्यक आहे. त्यांना CN95 अथवा किमान H1N1 वा किमान क्वालिटी मास्क उपलब्ध करून द्या. मेडिकेटेड सॅनिटीझर द्यावे व कडक उन्हाळ्यात सन कोट ची तातडीने व्यवस्था करावी.तसेच आशानी रूग्ण सर्व्हे करताना कोणती खबरदारी घ्यावी या बाबत प्रशिक्षण दयावे. वरील सर्व बाबतीत आपण योग्य ती कार्यवाही कराल हीच अपेक्षा.
*आपला - सलीम पटेल,महासचिव*
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji