सोलापूर :- कोरोना साथीच्या रोगाचा फैलाव व प्रसार रोखण्यासाठी मा .शासनाला अनेक उपाययोजना कराव्या लागल्या .काही कठोर निर्णय हि घ्यावे लागले आपण व आपले सर्व सहकारी या महामारी विरुद्ध सुरू असलेल्या युध्दात अहोरात्र संघर्ष करत आहात याची आम्हाला जाणीव आहे राज्यात जवळपास पंधरा लाख तिन चाकी परवाना धारक रिक्षा चालक /मालक आहेत बेरोजगारी वर मात करण्यासाठी अनेक सुशिक्षित बेरोजगार बेकार कामगार यांनी रिक्षा चालविण्याचा व्यवसाय स्वता:च्या हिम्मती वर सुरू केला भांडवल उभे करण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराने व्याज देऊन सरकारी  सहकारी व खाजगी वित्तीय संस्था कडून कर्ज घेतले या व्यवसाया करिता वाहन नोंदणी परवाना योग्यता प्रमाणात वाहन करापोटी महसूल ही शासनाला अदा केला आहे व आजही वार्षिक महसूल अदा करण्यात येत आहे या मध्ये विलंब झाल्यास दंडा सहित आकारणी परिवहन विभाग करते शासनचे सर्व दिशा निर्देशानुसार आपला व्यवसाय करतो मात्र तो कर्मचारी नाही व्यवसायात मालक कामगार हि संकल्पना नसल्याने ना किमान वेतन ना कामगार कायद्याचे संरक्षण दिवसाचे बारा चौदा तास प्रवाशांची सेवा करणारा हा रिक्षा चालक आज लॉकडाऊन मुळे हवालदिल झाला आहे या मध्ये एकही रिक्षा  चालक BPL चा कार्ड धारक नसल्याने अन्न सुरक्षा कायद्याचा लाभार्थी नाही त्यामुळे त्याला व त्यांच्या कुटुंंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे दारा समोर रिक्षा उभी आहे परंतु रोजगार नाही त्यामुळे हातात रोख शिल्लक उरली नाही कर्ज दिलेल्या वित्तीय संस्था परतफेडीची हप्ता मागत आहेत खाजगी वित्तीय संस्था थकित हप्ता पोटी व्याज बरोबर दंडाची आकारणी करत आहेत सध्या  हा रिक्षा चालक  दुहेरी कात्रीत सापडला आहे या परिस्थितीत शासना कडून मदतीची गरज आहे तरी लॉकडाऊन व  संचारबंदी मुळे बेरोजगार झालेल्या राज्यातील रिक्षा  चालकांना उदरनिर्वाह करिता धान्य बरोबर पाच हजार रुपये  ची आर्थिक मदत उपलब्धी  द्यावी रिक्षा खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचे EMI मा रिजर्व बँक च्या  निर्देशानुसार तीन महिने स्थगित करण्याचे विशेष करुन खाजगी व सहकारी वित्तीय संस्था ना आदेश करावे