मागील अनेक दिवसापासून संपूर्ण जगाला संकटात टाकणारी महामारी कोरोना अनेक दिवसां पासून रोद्ररूप धारण करीत आहे.सर्व प्रथम कोरोनाने चीन ला ग्रासले होते परंतु ते आपण येवढे गंभीर घेतले नसावे. कदाचित भारतातील अनेक लोक कोरोनाच्या भितीने आपल्या मायदेशी परतले व काही दिवसांनीच भारतात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरवातीला काही कळेनासे झाले होते. बाहेर पडू नका, गर्दी करू नका अशा सुचना येऊ लागल्या व हळूहळू बाहेरील गर्दी कमी होऊ लागली. त्यातच देशाला पंतप्रधान साहेबांनी दि.22 मार्च 2020 रोजी संपुर्ण देशाला जनता कर्फ्यु व नंतर लॉकडाऊन केले.त्यानंतर हळूहळू टी.व्ही.वरील बातम्या बघून कोरोना हा विषाणू किती गंभीर आहे हे लक्षात आले. सुरुवातीला दोन दिवस स्वतःला जपण्यातच गेले,सोशल मिडियामूळे हा विषाणू आहे त्या पेक्षाही किती जास्त घातक आहे हे दाखवण्यातआले व स्वतः ला घरात लॉकडाऊन करून घेतलं. असे वाटले शासन प्रशासन येवढं घरात बसा म्हणून विणवण्या करीत असल्यामुळे आपण घराबाहेर जाणे चुकीचे आहे असे ठरविले. म्हणून सुरवातीचा काळात घरात राहूनच शासणाला मदत केली पण त्या नंतर मात्र लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या लोकांचे हाल टी. व्ही.वर पाहून स्वतःचा स्वतःतील मानुस जागा झाला.स्वतः ला अनेक प्रश्न पडले या परिस्थिती स्वतःला कोरोना होऊ नये या भीतीने घरी बसावे की बाहेर उपाशी आहेत. त्यांना जमेल ती मदत करावी.अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात गुंतल्यामुळे मनस्थिती द्विधा नव्हतीच कारण मी स्वतः नास्तिक असल्या मूळे गरजूना मदत हेच ईश्वर सेवा हा कन्सेप्ट क्लिअर होता. म्हणून या विषाणू चा थोडा अभ्यास करून बाहेर पडली थोडे फार मदतीचे साहित्य सोबत होते.हॉस्पिटलचे ओळखपत्र असल्याने कुणी अडवले देखील नाही. पंहील्याच दिवशी राज कॉर्नर नांदेड येथे ताईच्या घरी थांबले.ताईच घर मुख्य रोड वर असल्याने काही अडचणीत सापडलेले गरजू रोडवर दिसत होते . सुरवातीला मदत करतानाचे फोटो देखील काढले. व अंधार पडला साधारणतः सायंकाळचे 7:00 वाजले असावेत.15 ते 20 वर्षे वयोगटातील 10 ते 15 पंधरा मुले पाठीवर छोट्या छोट्या बॅगा घेवुन समोर आले. त्यांच्या पाठीमागे परत 7 ते 8 मुले आलीत .साधारणता त्याच वयोगटातील ती आसवित ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना काही खाण्यासाठी वस्तू दिल्या.पण फार काही विचारपूस केली नाही. कारण दिवसभर अनेकान समजवून पोलीस पण थकले असावेत. हे सगळं सुरू असताना मी गच्चीवरून खाली आले. व मी त्यांना जवळ बोलावले आणि त्यांची सर्व चौकशी केली.कुठून आलात, कुठे जायचे आहे. असे रात्री का फिरताय अशी चौकशी केली . तेवढयात स्कुटीवर दोन मुले तिथे आले. कुठलेतरी कार्यकर्ते असावेत 20-25 जनामध्ये 4 ते 5 खिचडीचे पॕकेट त्यांना दिले आणि 5 -6 फोटो त्यांनी काढले व तेथून निघून गेले.
तेवढयात एक मुलगा रडत होता. मी त्याला हळूच विचारले क्या हुआ भाई...मग त्यांनी सांगितले आम्ही तेलंगना,हैद्राबाद व बासर येथील असून आम्ही अत्यंत अडचणीत सापडलो आहोत. आम्ही नांदेड येथील बेकरीवरील कामगार असून आम्हाला आमच्या मालकाने घरी जाण्यास सांगितले आहे. असे त्या पैकी दोन मुले पुढे येऊन सांगत होती. दिवसभरात त्यांच्या सोबत काय काय घडले हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अचानक घोषित झालेल्या लॉक डाऊन मध्ये ते सर्व अडकले होते. रूम वरील रेशन संपल्यामुळे ते एक एक बॕग घेऊन गावाकडे निघाले होते.
त्यांना अनेक लोक भेटले आगे जाव..आगे जाव म्हणत होते व पुढे गेल्यावर पोलीस त्यांना परत जाण्याचा सल्ला देत होते. अनेकांनी बिस्कीट खिचडी देऊन त्यांच्या सोबत फोटो काढण्यात दिवस गेला आणि अंधार पडला होता.आता जायचे कुठे हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. रूमवर जावे तर तसेच उपाशी राहावे लागेल ही भीती त्यांच्या मनात होती. काहीजण तर थकून खाली बसत होती. काहीजण माझ्याकडे आशेने पहात होती. काय करावे काही कळेनासे झाले. त्यांना पाहून मन थक्क झाले. ते दिवसभर वन- वन फिरत होते.त्यांना समजावून सांगण्या पेक्षा फोटो काढण्यातच अनेकांनी धन्यता मानली होती. त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना धीर द्यावा असे कुणालाही वाटले नसावे काय ?
प्रसिद्धीच्या नादात आपण मानूसकी तर विसरून जात नाही ना ! असे अनेक प्रश्न मनात घर करून जात होते. तेवढयात सिग्नल वरील पोलीसांनी सर्वांना जवळ बोलावले मी एक दोन सामाजिक कार्यकर्त्यांना हकीगत फोन वरून सांगत होते. शेवटी माझे सहकारी कॉ.गंगाधर गायकवाड यांना वरील माहिती कळविल्या नंतर ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनास सर्व माहिती देऊन त्यांना विनंती करू की, या लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या मजूरांना मदत करणे अवश्यक आहे. आणि ते आपण नक्कीच करू.
तेवढयात भाग्य नगर पोलीसांनी त्यांना ठाण्यात नेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या सर्व कामगारांची एका मंगल कार्यालयात व्यवस्था केली आणि तेव्हा मला मनस्वी समाधान झाले.. तेवढ्यात ती मुले एका लाईन मध्ये उभे राहिले व पुढे येऊन म्हणाले...."मॅडम आप फोटो नहीं निकलेंगे क्या" हातातील मोबाईल बॅग मध्ये ठेऊन तेथून निघाली.
4 टिप्पण्या
Good work. Keep it up.
उत्तर द्याहटवाNice mam we proud of u
उत्तर द्याहटवाIt's true mis ujwla, People are helping people just to show others if they really wanted to do something they can do their help without showing to society.I really like your blog.👌👍💐
उत्तर द्याहटवाgood work.
उत्तर द्याहटवाplease do not enter any spam link in the comment box.
Emoji