सांगोला :- किडेबिसरी येथे आज दिनांक बावीस एप्रिल अखेरपर्यंत जवळजवळ तीनशे जीवनावश्यक वस्तूंचे किट गरजू लोकांना वाटण्यात आले.15-20 दिवस पुरेल एवढा किराणा ऊपलब्ध करून दिला आहे.
युवा वर्गाने दिलेली हाक व सुरुवात त्याच खरंच कौतुक करण्यासारख आहे.युवा वर्गाने खास करून या गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांचे दुःख जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या नंतर किडेबिसरी गावांमध्ये मदतीचा ओघ चालू झाला आणि जवळजवळ आज अखेर अडीशे किट एकाच गावांमध्ये वाटण्यात आले हे खरंच कौतुकास्पद आहे.
दिनांक 13 एप्रिल 2020 रोजी डॉ. प्रकाश कोळेकर तंटामुक्ती अध्यक्ष किडेबिसरी तसेच विवेकानंद घेरडे, उद्योजक , प्रकाश गोविंद घेरडे कॉन्ट्रॅक्टर तसेच या गावचे युवा नेते व सरपंच मारुती दादा घागरे पाटील या तरुण युवकांनी 120 किट वाटून खऱ्या अर्थाने याची सुरुवात केली यांचं खरंच अभिनंदन करण्यासारख आहे.
या किट वाटपाची कल्पना खऱ्या अर्थाने मनामध्ये आणणारे आमचे ज्येष्ठ सहकारी माझे चुलते मा. भगवान दादा घेरडे साहेब राहणार कोळा या या अवलियाने याची सुरुवात केली यांचं मी पहिल्यांदा अभीनंदन करतो. एकाच व्यक्तीने जवळजवळ 140 किट ची व्यवस्था केली.
डॉ. प्रकाश कोळेकर तंटामुक्ती अध्यक्ष किडेबिसरी तसेच विवेकानंद घेरडे, उद्योजक , प्रकाश गोविंद घेरडे (कॉन्ट्रॅक्टर) व युवा नेते, सरपंच मारुती दादा घागरे पाटील या सर्व युवा वर्गाचे तसेच आमचे काका भगवान दादा घेरडे यांचं अभिनंदन व कौतुक. तसंच भाई गजेंद्र कोळेकर यांनी सुद्धा पंचायत समिती, मार्केट कमिटी व पक्षाकडून आलेले सगळे किटस गावांमध्ये आणून त्याचे वाटप केले. त्यांनीही त्यांचे प्रतिनिधित्व दाखवलं त्याबद्दल या सर्वाचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
आपला
डॉ. सुदर्शन घेरडे,
7066208459
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji