सांगली :-  काल सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीआशा वर्कर यांच्या साठी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या आशा स्वंयमसेविका यांना प्रोत्साहन पर भत्ता अदा करण्या बाबत चे पत्र काढले आहे यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे कि ग्रामपंचायत स्तरावर सर्व आशा वर्कर लोकांमध्ये जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे महाआयुष ,सर्व्हे करणे कोवीड१९ची निगडित इतर कामे अहोरात्र मेहनत घेवून जिवाची पर्वा न करता करीत आहेत सदर बाबी हया कामाचा भाग असल्या तरी देखील हे कर्मचारी आपल्या जीवाची जोखीम पत्करून ही कामे करीत असलेले त्यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त रु १०००इतकी प्रोत्साहन रक्कम अदा करण्यात यावा व ग्रामपंचायतीने  कोरोना चे काम संपेपर्यंत दरमहा १०००रु याप्रमाणे  प्रोत्साहन पर भत्ता दरमहा देण्यात यावा. असे लेखी पत्र सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायत ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा अभिजित राऊत यांनी काढले आहे .त्याबद्दल त्यांचे संघटनेच्या वतीने खुप खुप धन्यवाद