आज कृती समितीच्या वतीने २८८ जत  मतदारसंघातील  विद्यमान आमदार श्री विक्रम (दादा)सावंत यांना आशा व गटप्रवर्तकांचे  मानधन वाढीचे प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आवाज उठवावा व मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या कडे पाठपुरावा करावा  यासंदर्भात निवेदन देण्यात आले. महाआघाडी सरकार सत्तेत येताना सरकारच्या घटक पक्षांनी समान किमान कार्यक्रम तयार केला होता त्यामध्ये आशा /गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती सुधारण्याबाबत ठोस व स्पष्ट उल्लेख केला होता.त्याची अध्यापी काहीच अंमलबजावणी झाली नाही. या बाबत पाठपुरावा केल्यावर सदर प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे ही शासना कडून वेळोवेळी सांगण्यात आले आहे. गाव पातळीवर आशा व गटप्रवर्तक या आरोग्य व पोषणाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडत असतात .पण आशांना मिळणारे मानधन हे अंगणवाडी सेविकांच्या वेतनाच्या तुलनेत फारच अत्यल्प आहे. असा दुजाभाव योग्य नाही. तरी आशांना अंगणवाडी सेविकांच्या बरोबरीने वेतन मानधन मिळावे पण या बाबतीत सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत गेली ५/६ वर्षे सातत्याच्या आंदोलना नंतर व सप्टेंबर २०१९ मध्ये १५ दिवसाच्या संपानंतर राज्य शासनाने आशांच्या कामाच्या मोबदल्यात २००० रुपये वाढ करणारा शासकीय आदेश काढला .परंतु सदर आदेश गटप्रवर्तकांना लागू केला नाही त्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली. परंतु दुदैवाने अध्यापही या शासकीय आदेशाची अंमलबजावणी झाली नाही*
*आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांच्या प्रमुख मागण्या*
*१)आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा*
*२)अ- दिनांक १६/९/२०१९च्या शासकीय आदेशानुसार आशांच्या मोबदल्यात दरमहा २०००रुपये वाढ केलेली आहे. सदरील आदेशाची पूर्वलक्ष्यी प्रभावाने अंमलबजावणी करून त्यांच्या व्यतिरिक्त सेविकांना दरमहा पाच हजार रुपये ठराविक वेतन द्यावे तसेच कामावर आधारित मोबदल्याचे दर फर जुने आहेत त्यात दुपटीने वाढ करावी*
*ब-दिनांक१६/९/२०१९ च्या शासकीय आदेश गटप्रवर्तकांना ही लागू करून पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी करावी गटप्रवर्तक यांना सध्या८४२५ रुपये टी.ए .डी.ए मिळतो त्यांच्या व्यतिरिक्त गटप्रवर्तकांना दरमहा दहा हजार रुपये ठरावीक वेतन द्यावे*
*३)ग्रामीण भागातील आशा स्वयंमसेविकाना लॉकडाऊन च्या काळात काम केल्याबाबत दरमहा  एक हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता मिळतो गटप्रवर्तक यांना दरमहा पाचशे रुपये मिळतो असा भेदभाव का? नागरी भागात आशा स्वयंमसेविका ना काहीच भत्ता दिला जात नाही तेव्हा त्यांना सुध्दा प्रोत्साहन पर भत्ता देण्यात यावा शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज३००रुपये भत्ता देण्याचे आदेश काढलेले आहेत आशा व गटप्रवर्तक यांचे काम ही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामा इतकेच जोखमीचे असल्याने ग्रामीण व नागरी भागातील आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तक यांना सुध्दा दररोज३००रुपये प्रोत्साहन पर भत्ता देण्यात यावा*
*वरील मागण्या बाबत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याशी पत्राद्वारे पाठपुरावा कराल व आमच्या प्रलंबित प्रश्नावर आमच्या विभागाचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत आवाज उठवाल ही अपेक्षा आहे*
*यावेळी जिल्हा अध्यक्षा कॉ मिना कोळी ,जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी ,ललिता सावंत, व इतर आशा ही उपस्थित होत्या*