कवठेमहांकाळ:- कोरोनाच्या महामारी मध्ये आरोग्य विभागाचा कणा असे समजले जाणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांना कोरोना योध्दा म्हणून दिवाळीला भाऊबीज म्हणून आशा व गटप्रवर्तक यांना २०००रु देण्यात यावे व तसेच जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत यांनी आशा व गटप्रवर्तक यांना कोरोना कामाचा ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता अजून दिला गेला नाही अशा अनेक मागण्या बाबत राज्याचे माजी मंत्री मा अजितराव घोरपडे यांना व जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मा आशा पाटील या दोघांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व त्यांना सांगितले गेले कि आपण स्वता लक्ष्य घालून आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न मार्गी लावाल अशी अपेक्षा आशा व गटप्रवर्तक ह्या ठेवीत आहे.यावेळी संघटनेचे जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी ,आशा वर्कर्स सुनिता करपे, दिपाली चंदनशिवे, मनिषा पाटोळे मंगल कांबळे, कुसुम कोष्टी,इ उपस्थित होते
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji