*बचतगटांची दिवाळी अंधारात* 

 मुंबई:-सरकार ने महीला बचत गटांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पुन्हा सहकारी फेडरेशन ला मुदतवाढ दिली.
याबाबत वेळोवळी पत्रव्यवहार आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकारला पैसेवाल्यांची जास्त काळजी घेतली व महीला गटावर कर्जबाजारीपणा व बेरोजगारी लादली 
याबाबत  राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या व खासदार मा.सुप्रियाताई सुळे , सभागृह नेत्या निलमताई गोरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री व अजीतदादा पवार यांना सहकारी फेडरेशन चे काम ताबडतोब बंद करून  कोर्टाच्या आदेशानुसार आहाराचे काम बचत गटांना द्या  या मागण्यासाठी  आगंणवाडी आहार पुरवठादार संघटना (सीटु) यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी या. खासदार सुप्रिया ताई व मा. आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी ही गोष्ट फार गंभीर असुन महीला बचत गटाचे प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे याकरिता बालविकास मंत्री  यशोमती ठाकुर यांच्यासोबतच ताबडतोब चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.