घरची परिस्थिती अतिशय हलाखीची त्यात दुष्काळ!जगणं मुश्कील तरीही जिद्द कायम!कष्ट करून स्वतः बरोबर समाजातील वंचित घटकांची काळजी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या विषयी कमालीची कणव, जीवनाचा जगण्याचा संघर्ष करण्यासाठी आपल्या जन्मगाव कोकळे गावातून स्थलांतरित होऊन शिरढोण (ता.कवठेमहांकाळ)स्थिरस्थावर होण्याचा केलेला प्रयत्न, तरीही हार न मानणारा एक तरुण म्हणजे काँम्रेड दिगंबर कांबळे!होय यांना लाल सलाम करायलाच हवा!
परिस्थिती पुढे हार न मानता दोन हात करणारा हा युवक कायम जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरील लढाई करत राहिला म्हणून तो अस्सल काँम्रेड आहे!माणूस एकटा जगाच्या पाठीवर कुठेही जगू शकतो पण अनेकांना न्याय देण्याची भुमिका घेणार्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे!लोकांना न्याय हवा आहे परंतु न्याय देणारा माणूस लोक न्याय मिळाल्यानंतर लोकांकडून दुर्लक्षित होतो ही आमची वेदना आहे!मी ही चळवळ फार जवळून पाहिली आणि अनुभवली आहे!
दिगंबर हे एक उदाहरण आहे, अशा अनेकांनी लोकांच्या प्रश्नासाठी आयुष्याची होळी करून घेतली आहे, न्याय ज्यांना मिळवून दिला ते सुखाने जगत आहेत आणि न्याय देणारे भुके कंगाल आहेत!ही वस्तुस्थिती आहे.
काँम्रेड दिगंबर कांबळे परिस्थीतीशी झुंज देत बीएसएनएल मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम सुरू केले. खड्डे खणणे, तारा ओढणे अशी कामे तो करु लागला. याही ठिकाणी तो अस्वस्थ होता!कारण याही क्षेत्रात कमालीची पिळवणूक होत असल्याचे लक्षात आले आणि या बहाद्दराने चारशे मजूरांची अधिक्रुत संघटना बांधली आणि सिटुशी संलग्न करून घेतली. लाल बावटा, सिटुचे जिल्हाध्यक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले!
काँम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना२०१३ मध्ये किसान सभेच्या सरचिटणीस पदी काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी दुधदरवाढ, देवस्थान इनाम वर्ग-३खालसा चळवळ उभी केली, हमीभाव, गायरान जमीन कर्जमाफी, आणि अलिकडच्या काळातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मायक्रोफायनान्स कंपन्यांविरोधात मोठे आंदोलन केले आणि चांगले यशस्वी केले!
अगदी २०१७-१८ मध्ये किसान सभेने आकरा दिवसांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला होता की ज्या आंदोलनाची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. कष्टकरी, शेतकरी, मजूर, आदिवासी यांच्या पायांना चालून चालून फोड आहे, पाय भेगाळले पण मागे हटले नाहीत!या लाँग मार्चचे नेतृत्व काँम्रेड अजित नवले यांनी केले होते, त्या लाँग मार्चमध्ये आपले दिगंबर कांबळे होते!
रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे!शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिगंबर कांबळे यांनी जीवाचे रान केले. जमीन अधिग्रहण, मोबदला, त्या रस्त्यामध्ये जाणारी घरे, झाडे, विहिरी, कुपनलिका इ.ची भरपाई मिळविण्यासाठी हा माणूस रात्रंदिवस झटत होता. त्यांच्या बरोबर आपले कै.नामदेवराव करगणे सर आघाडीवर होते!हा लढा सोपा नव्हता पण लढला गेला आणि यशही मिळाले!
गरीबीशी झुंज देत असताना लढाई कशी लढावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काँम्रेड दिगंबर कांबळे!अशा व्यक्तीमत्वाला "बळीराजा सन्मान पुरस्कार"मिळत आहे या सारखा आनंद माझ्या सारख्या कार्यकर्त्याला दुसरा नाही!या पुरस्काराने चळवळीचे बळ वाढेल, सच्चा कार्यकर्त्याला दिशा मिळेल!म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो आणि महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेब रास्ते आणि बळीराजा सन्मान पुरस्कार समितीचे मी मनापासून अभिनंदन करेन कारण तुम्ही योग्य माणूस निवडला आहे!💐💐💐💐💐
धन्यवाद!
महादेव माळी सर,हिंगणगांव, ता.कवठेमहांकाळ
सध्या रहाणार-कोल्हापूर
मोबाईल नंबर--9923624545
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji