कुंडल :- आज क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुंडल येथे कोरोना च्या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना संसदरत्न लोकसभा खासदार श्रीमती सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आले व त्याचबरोबर आशा व गटप्रवर्तकांच्या वेतन वाढ बाबत लोकसभेत मांडण्यात यावे म्हणून लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने निवेदन ही देण्यात.यामध्ये
महाराष्ट्रांत शहरी व ग्रामीण विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 70 हजार आशा स्वयंसेविका व 4000 गटप्रवर्तक काम करतात .त्यांना कामावर आधारित मोबदला मिळतो .तो सुध्दा अत्यंत कमी मिळतो त्यामध्ये त्यांचा उदारनिर्वाह होऊ शकत नाही. त्यांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याचे महत्त्वाचे काम करीत असून त्यांच्या योगदानामुळे देशाच्या नागरिकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास मदत झाली आहे कोरोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन या महिलांनी रणरागिणी सारखे काम केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांची नेमणूक भारतीय संविधानाच्या 47 व्या कलमातील पूर्तता करण्यासाठी करण्यात आली आहे. त्यांचे काम कायमस्वरूपी आहे म्हणून त्यांना मानसेवी, मानधनी ,स्वयंसेविका समजणे अयोग्य आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची पदे कायद्यानुसार निर्माण केलेली पदे आहेत.(Statuory post) म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शासनाचे 'कर्मचारी'' असून केंद्र /राज्य सरकार त्यांचे मालक आहे व राष्ट्रीय आरोग्य अभिमान ही आस्थापना आहे त्यांना मिळणाऱ्या मानधनाला मोबदला म्हणून संबोधणे योग्य नाही ते वेतन आहे म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे ही नम्र विनंती
वरील परिस्थिती मध्ये आम्ही खालील मागण्या करीत आहोत.
१)आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देवून त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत.
२)राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे गटप्रवर्तकांचेही काम आहे तेव्हा गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्या मध्ये समाविष्ट करून घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांना दि ५/१०/२०२० पासून लागू करण्यात आलेली नवीन वेतनश्रेणी गटप्रवर्तकांना सुध्दा लागू करून मागील फरकासहीत त्यांना थकबाकी देण्यात यावी.
३)आशा स्वयंसेविकांचे व गटप्रवर्तकांचे कामावर आधारित मोबदल्याचे दर 5-6 वर्षापूर्वी ठरवलेले आहेत त्यांनतर महागाई दुपटी -तिपटीने वाढली परंतु त्या दरामध्ये बदल केलेला नाही वाढलेल्या महागाईच्या प्रमाणात कामावर आधारित मोबदल्याचे दर वाढवून देण्यात यावे.
४)आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कायम नेमणूकीचे लेखी आदेश देण्यात यावेत.
तरी वरील मागण्या आपण केंद्र स्तरावर पाठपुरावा करून सोडवण्यात यावे ही नम्र विनंती.
आपले नम्र
हणमंत कोळी ,लता जाधव,सुरेखा जाधव,शबाना आगा, सुवर्णा सणगर , राजश्री सुतार,रुपाली महाडिक, अरुणा कदम,
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji