डफळापूर:- डफळापूर मध्ये लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ शिवाजी मगदूम यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून या मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
या मेळाव्या मध्ये बोलताना  कॉ शिवाजी मगदूम असे म्हणाले की बांधकाम कामगार  संघटीत झाले पाहिजे  जे आता सर्वत्र बोनस कामगार नोंदणी केली जात आहे त्यावरती आळा घातला गेला पाहिजे जे खरे बांधकाम कामगार आहेत ते या योजनेपासून वंचित राहावे लागत आहेत .गाव तेथे बांधकाम कामगार संघटना स्थापन झाली पाहिजे येत्या १० ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने राज्य भर बांधकाम कामगार यांच्या मागण्या बाबत आंदोलन करण्यात येणार आहे तरी बांधकाम कामगार यांनी मोठ्या प्रमाणावर जिल्हा स्तरावर आंदोलन करण्यात यावे असे त्यांनी कामगारांना  या मेळाव्याच्या निमित्ताने आवाहन करण्यात आले यावेळी या मेळाव्यासाठी  कॉ शिवाजी मगदूम, कॉ हणमंत कोळी ,कॉ मिना कोळी, मुत्याप्पा जैनापूरे, बिरु हांडे, लखन केंगार, सदाशिव बनसोडे, अनिल साळे,अल्लाबक्ष नदाफ,लक्ष्मण लांडगे,सुनिल कांबळे, इराप्पा कोट्टलगी,राजेंद्र चंदनशिवे, अंकुश देवकते, सनी पाटोळे, संगिता शेजूळ, सुजाता कुंभार, रामेश्वरी चव्हाण, सारिका यादव, इ सर्व जण उपस्थित होते