खंभीर होत आपल्या मुलीचे नेत्रदान व देहदान करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला.


कालपर्यंत हसत होतो,पण दिवसे दिवस भयानकता वाढत चाललेने आता मात्र भीतीचे सावट गडद होऊ लागले आहे.तरी ही बांधवांनो केवळ घाबरून व भीती बाळगून चालणार नाही तर आलेल्या नैसर्गिक संकटाचा सामना धैर्याने व हिम्मतीने करायलाच हवा.त्यासाठी मुख्यत्वे काळजी घ्यायला हवी.हयगय हलगर्जीपणा करून चालणार नाही.आपलं व आपल्या प्रियजनांचे आयुष्य लाख मोलाचं आहे.त्यासाठी सतर्क व जागृत रहाणे आणि शर्थीचे प्रयत्न करणे गरजेचं आहे.

पंधरदिवसा पूर्वीचीच एक दुःखद व दुर्दैवी घटना.अत्यंत निकटच्या ओळखीतल्या व्यक्तीची १९ वर्षाची मुलगी.इयत्ता १४ वी सायन्सला असणारी अत्यंत हुशार व गुणी मुलगी.चेहऱ्यावरील मुरूमे पुटकुळ्या साठी एका निष्णात त्वचारोग तज्ञांकडे उपचार घेत होती.मात्र डॉक्टरांकडून दिले गेलेल्या औषधांचा तिला प्रचंड त्रास होत होता.कदाचित ती तिला सूट होत नव्हती.औषध घेतलेस तिला डोके दुखीचा त्रास होत होता.तीव्र वेदना होत होत्या.याबाबत तिने व तिच्या वडिलांनी उपचार घेत असलेल्या त्वचारोग तज्ञाना वारंवार सांगितले.मात्र त्यांनी हे औषध घेतलेस डोके दुखणार ते तुम्हाला सहन करायलाच पाहिजे असे निक्षून सांगितले नाईलाजास्तव वेदना सहन करत त्या मुलीने औषध सेवन करणे चालू ठेवले, शेवटी व्हायचा तो दुष्परिणाम झालाच,औषधांच्या साईट इफेक्ट्समुळे तिच्या वेदना इतक्या वाढल्या की तिला हॉस्पिटलाईज करावे लागले.उपचारा दरम्यान ती बेशुद्ध पडली,कोमात गेली, अखेर तीनचार दिवसांनी तिची प्राण ज्योत मावळली.

जर तिने सहन न होणाऱ्या त्या औषध उपचाराचे सेवन वेळीच थांबवले असते,अत्यांतीक त्रास होऊन ही औषधांचा डोस घेणे बंद केले असते.किरकोळ आजाराकडे तात्पुरते दुर्लक्ष करून गँभीर परिणामाकडे लक्ष वेधले असते किंवा यासाठी तिच्या वडिलांनी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला त्याच वेळी घेतला असता तर असा दुर्दैवी प्रसंग टळला असता.

पण नियतीच्या पुढे कुणाचे काय चालत नाही म्हणतात तसेच झाले.पोरगी हकनाक हातची गेली.अत्यंत हुशार मेरिटमध्ये सतत येणारी,वडिलांनी अत्यंत काबाडकष्ठाने मुलांना शिकवले,खूप हालात,कायमस्वरूपाचे काम नोकरी नसतानाही.मात्र शेवट हलगर्जीपणा मुळे असा करुण झाला.डोळ्यात रचलेली मुलीच्या भवितव्याची स्वप्ने सरणावरील ज्वालातून उडून गेलीत.अश्या अतीव दुःख प्रसंगात ही त्यांनी खचुन न जाता त्या अवस्थेत ही त्या मात्यपित्यानी स्वतःला सावरत,खंभीर होत आपल्या मुलीचे नेत्रदान व देहदान करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला.

ही दुर्दैवी घटना सविस्तर सांगणेच तात्पर्य हेच की कोणत्याही आजाराकडे पहाण्याचा दृष्टीकोन इतका सहज ठेवू नका.तशी आजची परिस्थिती नाही आहे.कोरोनाने तर सर्वांचे धाबे दणाणून सोडलेले आहेत.तेंव्हा काळजी घ्या,साधारण लक्षण जरी दिसून आले तरी लगेच तातडीने हयगय न करता आरोग्य केंद्रात जाणेस प्राधान्य द्या.स्वतःला आपल्या प्रियजणांना व नातेवाईकांना जपा.पटकन योग्य व खात्रीशीर उपचार घ्या,योग्य सल्ला घ्या,अनेक तज्ञांचे सल्ले अश्या प्रसंगी मोलाचे ठरतात.एकाच तज्ञावर विसंबून राहू नका ते चुकीचे ही असू शकतात.

तेंव्हा घाबरून व डगमगून न जाता,कोणतीही बाब किरकोळ मानून सोडून न देता,तात्काळ काळजी घेणे,सेवा व सावधानता बरसने हाच सर्वोत्तम उपचार व सर्वोत्तम पर्याय आहे.

--दिपक गोठणेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या