कोरोना (कोव्हीड-१९) : आपत्ती की ईष्टापत्ती

         मानव जातीचा (स्त्री-पुरुष उभयतांचा) पृथ्वीवरील बिग बॅंग नंतर जीव सृष्टीच्या उदयापासून तसेच इसा पूर्व काल खंडापासून ते इसवी सनाच्या २०२० च्या काळात इतिहास अतिशय शानदार राहिलेला आहे। मानवाने या कालावधीत त्याच्यावर आलेल्या असंख्य संकटांना अतुलनीय धैर्याने यशस्वीपणे तोंड दिलेले आहे। यातील काही संकटं निसर्ग निर्मीत तर काही स्वत: मानवाने निर्माण केलेली आहेत। सध्याच्या कोरोना च्या जागतिक संकटातून ही मानव आज ना उद्या निश्चित बाहेर पडेल।
           पृथ्वी वरील सजीव सृष्टी च्या निर्माती पासून आजतागायत मानवाने प्रचंड अशी प्रगती केलेली आहे। सुरुवातीला जंगलात राहून फळे खावून जगणारा, त्यानंतर शिकार करायला शिकल्यानंतर मांसाहार करुन जगणारा व नंतर शेतीचा शोध लावून जगभरातील विवीध नद्यांच्या सुपीक प्रदेशात वस्ती करुन माणूस समूहाने राहू लागला। समूह म्हणून वास्तव्य करताना माणसाने टोळ्या केल्या आणि टोळ्यांचा विस्तार केला। त्यायोगे माणूस सुरुवातीपासून नेहमीच समाजशील राहिलेला आहे।एकत्र समाजात राहताना सामाजिक जबाबदाऱ्या ठरवून घेवून त्यांचे वाटप आपापसात करुन घेतलेले होते।त्यामध्ये फळं गोळा करणे, शिकार करणे, शेती करणे व टोळीचे संरक्षण करणे इत्यादी बाबींचा ढोबळमानाने समावेश होता। 
          सुरवातीला भटकं आयुष्य जगणारा माणूस शेतीचा शोध लागल्यानंतर थोडा स्थीर-स्थावर झाला। त्यानंतर देखील वेगवेगळ्या कारणाने माणूस स्थलांतर करीत राहिला। तेंव्हापासून आजपर्यंत मानवाने प्रचंड प्रगती साधलेली आहे। निसर्गावर वेळोवेळी मात करण्याचा प्रयत्न करुन त्यात थोडं फार यशही कमावलेले आहे। 
सुरुवातीला टोळी करुन भटकं आयुष्य जगणाऱ्या माणसाने आज प्रगतीचे अजस्र ईमले उभारलेले आहेत। माणसाने इमारतीच्या जंगलेच्या जंगले जगभरात निर्माण केली। असंख्य सोई-सुविधा स्वता करीता निर्माण केल्या। प्रचंड प्रगती मानवाने साधलेली आहे। त्याच बरोबर पुर्वी समाजशील असणारा माणूस तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर अधिक समाजशील न बनता अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित बनत गेलेला आहे। 
          मात्र या सर्व गोष्टी सध्याच्या जागतिक महामारीत जागच्या जागी राहिल्या। अपवाद फक्त सायन्स नेहमीप्रमाणे आपल्या उपयोगास पडत आहे। अशा परिस्थितीत आपल्या विकासाच्या व्याख्या कुठे चुकतायत का❓हे पाहण्याची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते। मानवी समाजाने आजपर्यंतच्या सर्व अडचणींवर मात केलेली आहे। आजही तो या आपत्ती वर निश्चयाने मात करेल। मात्र यातून आम्ही काही शिकणार आहोत का❓ हाच माझ्यासमोर प्रश्न आहे। 
अॅड. सुधीर आर. गावडे, सांगली।