सध्या कोरोना या विषाणूचा संपूर्ण जगात प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी केंद्रशासन तसेच राज्य शासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. दि २०/०३/२०२० रोजी संघटनेच्या वतीने मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आशा वर्कर्स यांना कोरोना व्हायरस सर्व्हेच्या कामाचा भत्ता मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले होते. सतत संघटनेच्या पाठपुराव्या मुळे आता आशा वर्कर्स यांना प्रोत्साहन भत्ता१००० रु ग्रामपंचायत च्या १४ व्या वित्त आयोगातुन देण्याचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे. कोरोना व्हायरस देशभर हाहाकार माजले असता आरोग्य विभागाचा मजबूत कणा समजल्या जाणाऱ्या आशा वर्कर्स यांनी तरी आपल्या जीवाची पर्वा न करता शहरी व ग्रामीण भागात काम करत आहेत .देशभरात आशा वर्कर्स ९ लाखांच्या आसपास आहेत तर राज्यात ७२ हजार च्या आसपास आहेत .आशा वर्कर्स यांच्या मार्फत लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबविणे आरोग्याची काळजी घेणे इत्यादी कामे अहोरात्र मेहनत घेवून जिवाची पर्वा न करता करीत आहेत. वरील बाबी ह्या कामाचा भाग असल्या तरी देखील सदर कर्मचारी हे आपल्या जिवाची जोखोम पत्करून ही कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या नियमित मानधन व्यतिरिक्त त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji