🇮🇳 *महामार्ग संघर्ष समितीच्या घोगाव गावातील शेतकऱ्यांची 353च्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता* 👍
- दीड वर्षांपूर्वी दिनांक 13 सप्टेंबर 2018 साली कराड तासगाव महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या हद्दीतील वृक्षतोडीला विरोध केला म्हणून घोगाव तालुका पलूस येथील महामार्ग संघर्ष समितीच्या चार शेतकऱ्यांच्या वरती राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी भा. दं. वि. सं. च्या कलम ३५३, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. *घोगाव गावातील श्री. प्रशांत ( उदय) जाधव, श्री. हेमंत जाधव, श्री. मालोजीराजे पाटील, श्री. विजयसिंह (नाना) पाटील अशी निर्दोष मुक्तता झालेल्या बाधीत शेतकऱ्यांची नावे आहेत*
आज सांगली येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला. बाधीत शेतकर्यांच्या तर्फे सामाजिक चळवळीतील वकील अॅड. सुधीर गावडे यांनी शेतकऱयांची बाजू सविस्तर पुराव्यानिशी जोरदारपणे मांडली. त्यांना अॅड. मयुरेश माने, अॅड. अविनाश पवार यांनी सहाय्य केले. सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने या चारही शेतकऱ्यांची वरील गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली. *राष्ट्रीय महामार्ग व कंत्राटदार यांची दडपशाही व बळजबरीने विनामोबदला भूसंपादन करणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात आपला हक्क मिळविण्यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विजय सत्याचा विजय झालेला आहे.
कराड तासगाव महामार्गासाठी बोगस चुकीचे सर्वे करून, शेतकऱ्यांच्या हद्दीत चुकीचे मार्किंग करून शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई न देता दडपशाहीने शेतकऱ्यांची जमीन बळकविण्याचा जो कुटील डाव होता तो या निकालाने उघडकीस आला आहे. महामार्ग संघर्ष समितीचे ज्या कायदेशीर व खऱ्या मागण्या होत्या त्या या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध झाल्या आहेत...👍
*महामार्ग संघर्ष समिती आणि एकूणच आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय हा पुढील काळात मैलाचा दगड ठरणार आहे हे नक्की...*
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji