सांगली :- ग्रामीण भागातील आशा वर्कर्स यांना कोरोना व्हायरस सर्व्हे विना सुरक्षा साधना शिवाय लावले जात आहे याबाबत मा मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दि २०/०३/२०२०रोजी निवेदन देण्यात आले आहे . कोरोना व्हायरस ही जागतिक व राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली आहे. आपल्या कार्यालया कडून आशा वर्कर्स यांना आता  कोरोना व्हायरस बद्दल सर्व्हे घर टू घर करून घेण्यात येत आहे आशा वर्कर्स आपल्या भागातील लाभार्थी यांनी आरोग्याची काळजी घरातील लोकांच्या प्रमाणे घेत असतात मग त्या आशांची आरोग्याची काळजी कोण घेणार ? कोणतेही काम आशांच्या शिवाय होत नाही. तरी आशा व गटप्रवर्तक यांचे या बाबतीत चे प्रशिक्षण घेण्यात यावे लागणारी स्टेशनरी मास्क (सी एन ९५) किंवा नसेल (एच एन १) मास्क मिळावे हँन्डग्लोज सनकोट सँनीटाझर देण्यात यावे कारण अकोला जिल्ह्यातील एक आशा वर्कर माया नरेंद्र वाडीकर वय २४ जी स्वतः गरोदर होती त्या जिल्ह्यात स्वाईन फ्लयु झालेल्या रुग्णास औषधे देण्यास पाठवले असता त्याची लागण त्या आशा वर्कर ला झाली कारण तिच्या कडे कोणतेही सुरक्षा साधन नव्हते व ती मरत पावली आहे त्यामुळे आशा वर्कर्स साठी योग्य ती काळजी घेऊनच सुरक्षा साधने देवूनच आशांना सर्व्हे साठी पाठवण्यात यावे व या सर्व्हे चा भत्ता मिळावा  अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे