मुंबई:-सी आय टि यु व आशा गटप्रवर्तक फेडरेशन च्या वतीने मा मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या अनेक विषया संदर्भात ईमेल व्दारे निवेदन देण्यात आले
विषाणूचा प्रादुर्भाव आणि फैलाव रोखण्यासाठी सरकार , प्रशासनातील विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी , पोलीस , डॉक्टर , नर्सेस , वॉर्ड बॉईज , सफाई कामगार , अशी सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत . *यांच्या बरोबरच गावागावांमध्ये आणि शहरांमध्ये आशा कर्मचारी व गटप्रवर्तक अत्यंत जिध्दीने त्यांची कामे करीत आहेत .* आशा कर्मचाऱ्यांना सर्व्हे
करणे , दिवसाला पन्नास घरांना भेटी , औषध वितरण करणे इत्यादी कामे करावी लागत आहेत . ज्या जिल्हयांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा जिल्ह्यात काम करताना नागरिक आशांना घरांमध्ये ही घेत नाहीत , त्याच्याशी बोलायला विरोध करतात , नागरिकांचे सहकार्य मिळत नाही असे अनेक ठिकाणी होत आहे . गटप्रवर्तकानाही महिन्यात 20 भेटी द्यायच्या आहेत . सर्वच गट प्रवर्तकांकडे स्वतःची साधने नाहीत व त्यामुळे त्यांना बाहेर जाणे अवघड आहे . अशा अनेक समस्यांना तोंड देत आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक काम करत आहेत . आशांना तसेच गटप्रवर्तकानाही वैयक्तिक सुरक्षा साधने उपलब्ध झालेली नाहीत . *मास्क , सनकोट , ग्लोज सॅनिटीझर यांचा पुरवठा सर्वत्र झालेला नाही.* त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
*आशाच्या कामाचे कौतुक मा . पंतप्रधान यांनीही केले होते.* आपणासही त्यांच्या योगदाना बाबत माहिती आहे *या आशा कर्मचान्यांना 1/1/2020 पासून 2000 रुपये मानधन वाढ देण्याचा निर्णय* आपल्या सरकारने नागपूर अधिवेशनात घेतला होता परन्तु त्याची अंमलबजावणी अध्यापि केली नाही . सदरचा मानधनवाढीचा प्रस्ताव आपल्या विचारार्थ सादर आहे परंतु करोनाच्या प्रसार व प्रादुर्भावामुळे याबाबत निर्णय झालेला नाही . *या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपणास विनंती आहे की आशा कर्मचाऱ्यांची मानधन वाढ पूर्वी झालेल्या निर्णयानुसार 1/1/2020 पासून दरमहा 2 हजार रुपये याप्रमाणे तातडीने लागू करावी तसेच गटप्रवर्तकांना दरमहा 3500 रुपये याप्रमाणे मानधन वाढ 1/1/2020 पासून लागू करावे, तसेच आशा कर्मचान्यांना 1000 रुपये दरमहा याप्रमाणे तीन महिन्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय आपण जाहीर केला आहे. परंतु गटप्रवर्तक यांना मात्र फक्त पाचशे रुपये दरमहा दिले जातील असेही जाहीर केले आहे .हा गटप्रवर्तका वर अन्याय आहे. त्यांना दरमहा 2 हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे अशी आपणास विनंती आहे.* करोना विषाणूंचा प्रादुर्भाव आणि फैलाव रोखण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत . आपण याबाबत करत असलेल्या प्रचंड मेहनतीचा आम्ही आदर करतो . आपण निश्चितपणे त्या संकटातून बाहेर पडू आम्ही आमचे जबाबदारीने कर्तव्य पार पाडू असे आम्ही आपणास आश्वासित करू इच्छितो . .1)* राज्यातील 72 हजार आशा कर्मचारी व गटप्रवर्तक याना यापूर्वी झालेल्या निर्णयानुसार मानधन वाढ लागू करणेबाबत ,
2 )* तसेच गटप्रवर्तक यांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ करणेबाबत .
*आपला ,*
*डॉ.डी.एल.कराड*
*राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष सिटू*
*सलीम पटेल*
*सरचिटणीस महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन .*
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji