आज मायक्रो फायनान्स कंपनी विरोधात नायब तहसिलदार मा .डी बी माळी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉ हणमंत कोळी यांनी निवेदन दिले
ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यानी व्याजाची वसुली करण्यासाठी बचत गटातील महिलांना तगादा लावला असुन या कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी माकपच्या वतीने करण्यात येत आहे
गरीब व मध्यमवर्गीयांना बँकांचे दार बंद असल्याने अनेक गोरगरीब जगण्यासाठी छोट्या व्यवसायाचे स्वप्न पाडतात. त्यासाठी मग मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतात त्या कर्जाची परतफेड देखील करतात दरम्यान कोरोनामुळे मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन च्या काळात या कंपन्या कडून वसुली थांबविण्यात आली होती .मात्र आता थोडी शिथिलता मिळताच या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कर्ज वसुली सुरू आहे. ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स सक्तीने कर्ज वसुली करत असुन या फायनान्स कंपन्यावर जिल्हाधिकाऱ्यानी कारवाई करावी अशी मागणी माकपच्या वतीने करत आहोत दरम्यान कोरोनासारख्या महामारीत या कंपन्यांकडून व्याज भरण्यासाठी तगादा लावणे चुकीचे आहे तरी या कंपन्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती यावेळी अतुल शिंदे, वैभव मासाळ, रघुनाथ पोरे ,कोमल पोरे इत्यादी सर्व जण उपस्थित होते
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji