आज तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील विद्यमान आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांना आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढी संदर्भात निवेदन देण्यात आले  व त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री मा ना राजेश टोपे यांना आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढी बाबत फोन वर चर्चा ही केली व त्यांनी संघटनेला आश्वासन दिले आहे 

कि आशा ह्या तळागाळापर्यंत आरोग्याचे काम करत आहेत  ,  कामाला दाम मिळाला पाहिजे त्यासाठी मी येत्या पावसाळी अधिवेशनात आशा व गटप्रवर्तकांचे मानधन वाढी बाबत विधानसभेत आवाज उठवणार असे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा अध्यक्षा कॉ मिना कोळी ,जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी आशा स्वयंमसेविका शहिदा मुल्ला, अंजुम मुलाणी, रशिदा मुल्ला इ सर्व जण उपस्थित होते