महामार्गात जाणारी शेकडो एकर शेतजमीन वाचविण्यात महामार्ग संघर्ष समितीला यश
- डॉ अमोल पवार
3 वर्षांपूर्वी 32 ते 42 मीटर एकूण रुंदीत काम चालू करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला आज फक्त 7 ते 9 मीटरच्या अत्यन्त छोट्या जागेमध्ये महामार्गाचे काम करायला लागते आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीचे यश आहे. महामार्ग संघर्ष समितीचे आंदोलन व हाय कोर्टात असणाऱ्या केसमुळे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना रस्त्याकडेला असणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना जमीनीची मोजणी करून देण्यासाठी भाग पाडल्याने आता शेतकऱ्यांची हद्द निश्चित करण्यात येत आहे, अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करायची प्रक्रिया चालू आहे, आता महामार्गबाधित शेतकऱ्यांची हद्द ही आता अगदी मूळच्या रस्त्याकडेला आलेली आहे, त्यामुळे आता हजारो शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन महमार्गात जाण्यापासून वाचणार आहे, रस्त्याकडेची बहुसंख्य झाडे आता शेतकऱ्यांच्या मालकीची झाल्यामुळे रस्त्याच्या कडेची हजारो झाडांची वृक्षतोड होण्यापासून वाचली आहे, पूर्वी जी कंत्राटदारानी असंख्य झाडांची अमानुष वृक्षतोड केलेली होती ती आता बेकायदेशीर ठरली आहे*, असंख्य माहिती अधिकार टाकून माहिती मिळवून, असंख्य शेतकऱ्यांच्या साहयाने बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करून अनधिकृत काम करण्यापासून राष्ट्रीय महामार्गाला रोखण्यात आले होते, इकडे विविध आंदोलने, निवेदने देऊन सातत्याने शेतकऱ्यांची बाजू विविध माध्यमाच्या साहयाने मांडण्यात आली. महामार्ग कडेच्या सर्व गावात विविध मीटिंग घेऊन सर्वसामान्य जनतेला हजारो शेतकऱ्यांच्या वर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देण्यात आली, प्रत्येक गावात हा महामार्ग संघर्ष उभा करण्यात आला.
अश्याप्रकारे महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या 3 वर्षाच्या अथक संघर्षामुळे व आंदोलनामुळे या कराड तासगाव 266 क्रमांकाच्या महामार्गात जाणारी हजारो शेतकऱ्यांची, शेकडो एकर पिकावू बागायती शेतजमीन वाचवण्यात आली आहे, हजारो झाडे वृक्षतोडीपासून वाचवन्यात आलेली आहेत, हे संपूर्ण यश महामार्ग संघर्ष समितीच्या सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीचे फळ आहे असं महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख डॉ अमोल पवार यांनी म्हटले आहे...
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji