जत तालुक्याच्या दौऱ्यावर असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा ना जयंत पाटील यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात
कोरोनाच्या महामारी मध्ये आरोग्य विभागाचा कणा असे समजले जाणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांना आपल्या सरकारने जुलै मध्ये मानधन वाढीची घोषणा करण्यात आली होती पण अजून पर्यंत ही मानधन वाढ मिळाली नाही  व कोरोना योध्दा म्हणून दिपवाळीला भाऊबीज म्हणून आशा व गटप्रवर्तक यांना २०००रु देण्यात यावे व महानगरपालिका ,नगरपालिका, नगरपरिषद, येथील आशा वर्कर्स यांना कोरोनाच्या कामाचे प्रोत्साहन भत्ता दिला गेला नाही तसेच माझे कुंटुंब माझी जबाबदारी या सर्वेचे मानधन १५०रु आहे ते ३००रु प्रमाणे मिळावे तरी याबाबत आपण स्वता लक्ष्य घालून आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न मार्गी लावाल अशी अपेक्षा आशा व गटप्रवर्तक ह्या ठेवीत आहे